राष्ट्र उभारणीसाठी युवकांच्या सहभागाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:29+5:302021-07-27T04:42:29+5:30
ठाणे : राष्ट्र उभारणीसाठी दिल्लीत देशभरातील १५ हजार युवकांसाठी '' राष्ट्रीय युवा संसद '' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ...
ठाणे : राष्ट्र उभारणीसाठी दिल्लीत देशभरातील १५ हजार युवकांसाठी '' राष्ट्रीय युवा संसद '' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन दिल्लीचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय यांनी ठाणे शहर आणि जिल्ह्यातील युवा, युवतींना रविवारी केले.
येथील ठाणे कॉलेजमध्ये '' देश की बात '' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारत छोडो चळवळीचे स्वातंत्र्य सेनानी डॉ. जी.जी. पारीख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ठाणेकर युवकांसाठी पार पडला. १ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत '' राष्ट्रीय युवा संसद '' पार पडणार आहे. राय संस्थापक असलेल्या '' देश की बात फाउंडेशन '' च्या नेतृत्वाखाली या संसदेचे आयोजन केले आहे. यासाठी युवा, युवतींनी योगदान देण्यासाठी राय यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केल्याचे आयोजक उन्मेश बागवे यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुभाष तन्वर, अनिल हेरंंब यांनी सहभाग घेतला.