भिवंडीतील कामवारी नदीच्या स्वच्छतेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष; नदीला हिरव्या जलपर्णीचा विळखा

By नितीन पंडित | Published: February 23, 2023 05:54 PM2023-02-23T17:54:21+5:302023-02-23T17:54:58+5:30

भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीकडे सध्या प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.

Neglect of the system to clean the Kamwari River in Bhiwandi; The river is full of green algae | भिवंडीतील कामवारी नदीच्या स्वच्छतेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष; नदीला हिरव्या जलपर्णीचा विळखा

भिवंडीतील कामवारी नदीच्या स्वच्छतेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष; नदीला हिरव्या जलपर्णीचा विळखा

googlenewsNext

भिवंडी- भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीकडे सध्या प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नदी पात्रात अतिक्रमण केले असून शेलार मीठ पाडा नजीकच्या डाईंग साईजिंग कंपन्यांचे केमिकल मिश्रित घातक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने कामवारी नदी प्रदूषित झाली आहे.

 शहरातील नदी नाका परिसरात असलेल्या गणेश घाटाच्या चहूबाजूला या नदीवर हिरव्या जलपर्णींचा खच पडला असून दुसऱ्या बाजूला खाडीपात्रात मिळणाऱ्या नदीची पार गटारगंगा बनली आहे. विशेष म्हणजे या नदीच्या दुरावस्तेकडे स्थानिक महानगरपालिका प्रशासनासह, प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक ग्रामपंचायतींचे व महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून सेवाभावी संस्था देखील या नदीच्या पुनर्जीवनासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नसल्याने कामवारी नदी नदी सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.

Web Title: Neglect of the system to clean the Kamwari River in Bhiwandi; The river is full of green algae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे