मामाकडे भाच्याने मागितली एक कोटीची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:12 AM2024-02-16T11:12:49+5:302024-02-16T11:13:34+5:30

तरुणास अटक; एसीबीमध्ये तक्रार करण्याची दाखविली होती भीती

Nephew demanded a ransom of one crore from uncle | मामाकडे भाच्याने मागितली एक कोटीची खंडणी

मामाकडे भाच्याने मागितली एक कोटीची खंडणी

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एमआयडीसीतून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेल्या मामाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) भीती दाखवत त्याच्याकडून एक काेटीची खंडणी उकळणाऱ्या मंगेश अरुण थोरात (२९, रा. पाइपलाइन रोड, यशाेदानगर, सावेडी रोड, अहमदनगर) या भाच्याला ठाणे खंडणी विराेधी पथकाने अटक केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील रहिवासी सुभाष  तुपे (५९) हे एमआयडीसीतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी जयश्री तुपे यांनी एमआयडीसीमधूनच कार्यकारी अभियंता पदावरून राजीनामा दिला आहे.  तुपे दाम्पत्याने त्यांचा भाचा मंगेश याला व्यवसायासाठी ६१ लाख रुपये दिले होते. तसेच, या दाम्पत्याने पुनीत कुमार (रा. उत्तर प्रदेश) याच्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने एक काेटी २५ लाखांची गुंतवणूक केली हाेती. यासंदर्भात करारही केला होता. परंतु, पुनीत कुमार त्यांना पैसे परत देत नव्हता. त्यामुळे तुपे दाम्पत्याने हे  पैसे काढून देण्यासाठी त्यांचा भाचा मंगेशकडे हा करार देऊन काही रक्कमही दिली होती. जयश्री यांनी मंगेशला दिलेल्या करारनाम्याचा त्याने गैरफायदा घेऊन तसेच  संभाषण रेकाॅर्डिंगचा आधार घेत २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान तुपे दाम्पत्याला एसीबीमध्ये तक्रार आणि  बदनामीची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तर, आरोपीला दिलेले उसने पैसे परत मागू नये म्हणून त्याने दाम्पत्याकडे  एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. 

Web Title: Nephew demanded a ransom of one crore from uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.