ठाणे जिल्ह्यात अपघात स्थळांचे लवकरच नेट टॅगिंग; अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवरील ६८ ब्लॅक स्पॉटचा शोध

By सुरेश लोखंडे | Published: November 25, 2018 07:49 PM2018-11-25T19:49:33+5:302018-11-25T19:53:39+5:30

रस्त्यांवरील या अपघाती व धोकादायक ठिकाणांना ‘‘ ब्लॅक स्पॉट्स ’’ म्हणून घोषीत करण्यासाठी विविध निकषांचा समावेश आहे. यामध्ये रस्त्यावरील कोणताही ५०० मीटरचा असा भाग जिथे गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झालेले ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी किमान दहा व्यक्ती अपघातात मेलेल्या व गंभीर जखमी झालेल्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. या अपघाती व धोकादायक याठिकाणी बांधकाम विभागांनी आवश्यक ती दुरूस्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगविणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रु ग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा आॅडीट आदी कामे तातडीने करणे अपेक्षित आहेत.

Net tagging of accidents sites in Thane district soon; The search of 68 black spots on the road to avoid accidents | ठाणे जिल्ह्यात अपघात स्थळांचे लवकरच नेट टॅगिंग; अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवरील ६८ ब्लॅक स्पॉटचा शोध

रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Next
ठळक मुद्दे१६८ किलो मीटरच्या जिल्हा मुख्य महामार्ग (एमडीआर) कार्यक्षेत्रात अपघाती व धोकादायक ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’चा समावेश रस्त्यावरील कोणताही ५०० मीटरचा असा भाग जिथे गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झालेले ठिकाणांचा समावेश ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ३०१ अपघाती ठिकाणांची ‘‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’’ किमान दहा व्यक्ती अपघातात मेलेल्या व गंभीर जखमी झालेल्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट

सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्गांच्या रस्त्यांवरील जास्तीत जास्त अपघात होणारे ठिकाणाना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुमारे ६८ ठिकाणं अपघाती ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून आढळून आल्याचे घोषीत करण्यात आले आहेत. येथील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी व तात्पुर्त्या स्वरूपात उपाययोजना करून संबंधीत जागा इंटरनेटव्दारे टॅगिंग करून ती आॅनलाईन करण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्नशील आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीपुढे राज्याने रस्ते अपघात नियंत्रण संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला. त्यास अनुसरून समितीन दिलेल्या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचा आढावा नुकताच गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यास जिल्हाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी पोलिस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील ६८ ठिकाणांना अपघाती ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून निश्चित करण्यात आल्याचे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले.
जिल्ह्यातील या ६८ ब्लॅक स्पॉट पैकी किरकोळ सुधारणा करण्यात येणाऱ्यां ब्लॅक स्पॉटची दुरूस्ती तत्काळपूर्ण करून उर्वरित ब्लॅक स्पॉट बाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केलेल्या ठिकाणांना सुमारे एक वर्षापूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घोषीत केल्याप्रमाणे इंटरनेटशी कनेक्ट केले जाणार आहे. आॅनलाइन टॅगिंग होणाऱ्यां या ठिकाणी अपघात घडताच संबंधीत कंट्रोलरूमला त्यांची तत्काळ माहिती मिळेल आणि प्रशासनाला बचावात्मक उपाययोजना तत्काळ करणे शक्य होणार आहे.
ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केलेल्या या ८६ ठिकाणांपैकी कल्याण अहमदनगर या २२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर १२ ठिकाणाना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषीत केले आहेत. यामध्ये भिवंडी बायपासच्या परिसरात आठ ठिकाणांचा समावेश आहे. तर कल्याण, मुरबाडसह माळशेज घाटात चार ठिकाणांची ब्लॅक स्पॉट म्हणून नोंद झाली असल्याचे या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले. माळशेज घाटातील या अपघातील ठिकाणांजवळ अपघात स्थळ दर्शवणारे वाहतुकीचे चिन्ह, कॅट आईज, डेलाइनटोर्स, थर्माेप्लास्टीक पेंटींग आदी उपाययोजना केल्या आहेत. याप्रमाणेच भिवंडी बायपासजवळील ब्लॅक स्पॉटच्या जवळपास उपाययोजना लवकरच करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांवरी ठिकठिकाणचे ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’ म्हणजे अतिधोकादायक अपघात ठिकाणं शोधण्याचे आदेश जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी महापालिकांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आदी यंत्रणाना सुमारे एक वर्षापूर्वी दिले आहेत. त्यानुसार लोकमतने काही ठिकठिकाणची चाचपणी केली असता ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ३०१ अपघाती ठिकाणांची ‘‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’’ म्हणून नोंद घेण्यात आली होती. यामध्ये कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील ठिकठिकाणांसह माळशेज घाटातील अपघाती जागा आणि पालघर, जव्हार परिसरातील रस्त्यांवरील अपघाती व अतिधोकादायक ठिकाणांचा समावेश होता.
राष्ट्रीय  महामार्ग २२२ वरील ब्लॅक स्पॉट वगळता उर्वरित ब्लॅक स्पाट जिल्ह्यातील सर्वाजनिक बांधक विभाग १ चे बहुतांशी क्षेत्र महापालिकांच्या कार्यक्षेत्रासह बांधकाम विभाग २ च्या १६८ किलो मीटरच्या जिल्हा मुख्य महामार्ग (एमडीआर) कार्यक्षेत्रात अपघाती व धोकादायक ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’चा समावेश आहे. या ठिकाणांची कायमस्वरूपी अपघात व तात्पुरस्त्या स्वरूपाच्या अपघाती ठिकाणांचा समावेश आहे. रस्त्यांवरील या अपघाती व धोकादायक ठिकाणांना ‘‘ ब्लॅक स्पॉट्स ’’ म्हणून घोषीत करण्यासाठी विविध निकषांचा समावेश आहे. यामध्ये रस्त्यावरील कोणताही ५०० मीटरचा असा भाग जिथे गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झालेले ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी किमान दहा व्यक्ती अपघातात मेलेल्या व गंभीर जखमी झालेल्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. या अपघाती व धोकादायक याठिकाणी बांधकाम विभागांनी आवश्यक ती दुरूस्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगविणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रु ग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा आॅडीट आदी कामे तातडीने करणे अपेक्षित आहेत.

Web Title: Net tagging of accidents sites in Thane district soon; The search of 68 black spots on the road to avoid accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.