नवीन ७ ट्रान्सफार्मर वाड्यात कार्यान्वित

By admin | Published: May 7, 2017 01:26 AM2017-05-07T01:26:23+5:302017-05-07T01:26:23+5:30

राज्यातील गाव-पाड्यांमध्ये वीज पोहचली पाहिजे या शासनाच्या धोरणानुसार तसेच महावितरणच्या डिपीडीसी योजनेअंतर्गत कामतपाडा - सांगे, मानकुलीपाडा

New 7 Transformer Wad | नवीन ७ ट्रान्सफार्मर वाड्यात कार्यान्वित

नवीन ७ ट्रान्सफार्मर वाड्यात कार्यान्वित

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : राज्यातील गाव-पाड्यांमध्ये वीज पोहचली पाहिजे या शासनाच्या धोरणानुसार तसेच महावितरणच्या डिपीडीसी योजनेअंतर्गत कामतपाडा - सांगे, मानकुलीपाडा - गोऱ्हे, तुंबडेपाडा - सापने (बु), आदिवासीपाडा - सोनशिव, दळवीपाडा (तिळसे), वंगणपाडा - पिंजाळ, सागपाडा - वरसाळे या सात ठिकाणी नवीन रोहित्र (ट्रान्सफार्मर) बसविण्यात आले असून, त्यांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की, या रोहित्रांमुळे आजूबाजूच्या गावपाड्यातील वीजेच्या समस्या निश्चित कमी होणार असून जेथे कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. तिथे आता योग्य दाबाने वीज पुरवठा होऊ शकेल. विद्यार्थ्यांची सुध्दा वीजे अभावी खूप गैरसोय होत होती. ती आता कमी होईल. शेती पंपाना वीज पुरवठा होईल, तसेच नळपाणी पुरवठा योजनेसाठीही याचा फायदा होणार आहे.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांनीही या विद्युतीकरणाचा लाभ घेऊन शेतीतील उत्पादन वाढवावे. यापुढे एकही गावपाडा वीजपुरवठ्यापासून वंचित रहाणार नाही याची काळजी घेतली जाईल.
दरम्यान, गोऱ्हे येथे झालेल्या कार्यक्र मात नवीन वीज जोडणी मीटरचे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, जेष्ठ नेते मधुकर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य व पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदकुमार पाटील, वसई महावितरणचे अधिक्षक अभियंता अरु ण पापडकर, पालघरचे दिपक पाटील, वसईचे कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कल्याणचे सुधाकर जाधव, उप अभियंता लक्ष्मण राठोड,
पंचायत समितीच्या सभापती मृणाल नडगे, जिल्हा परिषद सदस्य
भालचंद्र खोडका, कृषीभूषण अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य अरु ण अधिकारी, भाजपचे मिलिंद वाडेकर, रोहन पाटील, भरत जाधव, कुणाल साळवी स्थानिक सरपंच, उपसरपंच व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: New 7 Transformer Wad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.