डोंबिवली स्थानकात होणार नवीन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:22 AM2018-09-22T03:22:32+5:302018-09-22T03:22:34+5:30

डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० मध्ये बांधण्यात आलेला पादचारी पूल जुना झाल्याने नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

 A new bridge to be held at Dombivli station | डोंबिवली स्थानकात होणार नवीन पूल

डोंबिवली स्थानकात होणार नवीन पूल

googlenewsNext

डोंबिवली : डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० मध्ये बांधण्यात आलेला पादचारी पूल जुना झाल्याने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. दोन महिन्यांत त्याच्या कामाला सुरुवात होईल. हा पूल जूनपर्यंत बांधण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर सध्याचा पूल तोडण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी दिली.
जैन यांनी शुक्रवारी डोंबिवली स्थानकाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी स्थानकातील फलाट क्रमांक १ ते ५, सर्व पादचारी पूल, स्थानकातील सर्व प्रवेशद्वारे, तिकीटघर आदींचा परिसर, स्वच्छतागृहे, पादचारी पुलांच्या पायऱ्या, पाणपोया, स्वयंचलित जिने यांची दोन तास पाहणी केली. यावेळी त्यांनी अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानक परिसर आणि शौचालये स्वच्छ राखण्यासंदर्भात त्यांनी स्थानक व्यवस्थापक, सफाई अधिकारी, कर्मचारी आदींना सूचना दिल्या. भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. स्थानकातील इंडिकेटर, पंखे, दिवे सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. पत्र्यांवरही स्वच्छता असावी. फलाटांवरील उपाहारगृहांच्या चालकांसोबत बैठक घेऊन अस्वच्छता आढळल्यास कारवाईची ताकीद देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारांबाहेरील महापालिका हद्दीत अस्वच्छता असेल, तर ती दूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार करा, बैठक घ्या, असेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, या दौºयाच्या वेळी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ अभियंते, रेल्वे पोलीस दलाचे स्थानिक अधिकारी आर.के. मिश्रा, लोहमार्ग पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
>प्रवाशांनी सहकार्य करावे
स्वच्छतेसाठी डोंबिवली स्थानकात ३८ सफाई कर्मचारी आणि सात स्वच्छता यंत्रे आहेत. सफाई कर्मचाºयांवर देखरेखीसाठी तीन सुपरवायझर आहेत. परंतु, आपण स्वच्छतेबाबत समाधानी नाही, असे जैन म्हणाले.
२ आॅक्टोबरला महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रवासी व महापालिकेनेही सहकार्य करावे, असे आवाहन जैन यांनी केले.

Web Title:  A new bridge to be held at Dombivli station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.