विक्रमगडला हवे आहे नवे बसस्थानक

By admin | Published: February 4, 2016 01:58 AM2016-02-04T01:58:02+5:302016-02-04T01:58:02+5:30

विक्रमगड तालुका असूनही येथे अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथील प्रवाशांना उन्हांत, पावसात, थंडीत तासनतास ताटकळत एसटीची वाट पाहावी लागते़

New bus station needs Vikramgad | विक्रमगडला हवे आहे नवे बसस्थानक

विक्रमगडला हवे आहे नवे बसस्थानक

Next

राहुल वाडेकर,  तलवाडा
विक्रमगड तालुका असूनही येथे अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथील प्रवाशांना उन्हांत, पावसात, थंडीत तासनतास ताटकळत एसटीची वाट पाहावी लागते़
तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लांखाच्या घरात आहे़ तर विक्रमगड गावाची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे़ येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजे ६० ते ७० एस़ टी़ बस असून त्यांना विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये बॅका, शाळा, महाविद्यालय, इंजीनिअरिंग कॉलेज, आय़ टी़ आय व विविध आस्थापनांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विदयार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे असंख्य प्रवासी एसटीचा वापर करीत असतात़ मात्र तालुका निर्मितीला १७ वर्षे आज झाली तरी हे शहर एसटीच्या सुसज्ज स्थानकापासून वंचित आहे. महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे ते ही असून नसल्यासारखेच आहे़ कारण त्यासमोर बस थांबविण्यासाठी व प्रवाशांना उभे राहाण्यासाठीही जागा नाही कारण रस्त्यालगतच किरकोळ दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत. सध्याची पिकअपशेड त्यावेळचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधीतून १७ वर्षापूर्वी बांधलेली आहे़ त्यामुळे एस़टी महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय असा सावाल उपस्थित केला जात आहे़
विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९५ गावपाडयांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव-खेडेपाडयातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगहुन एस टी बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, यंबकेष्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतांत़ मात्र तालुक्याचे मुख्यालय असूनही विक्रमगडशहरात अद्यापही अद्यावत असे एस टी बसस्थानक नाही़ परिणामी प्रवाशांची मोठयाप्रमाणावर गैरसोय होत असल्यचे चित्र पहावयास मिळत आहे़ वृध्द, रुण, महिला प्रवासांसाठी प्रसाधनगृहाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांचे तर हाल पाहावत नाही़

Web Title: New bus station needs Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.