ठाण्यात न्यू क्राफ्ट सिल्क इंडिया एक्झिबिशन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:20+5:302021-09-24T04:47:20+5:30
या एक्झिबिशनमध्ये उप्पडा, बनारसी, सिल्क, गढवाल, धर्मावरम, जमदानी, जमवार आणि संबलपुरी साड्या उपलब्ध आहे. साड्यांसह ड्रेस मटेरियल, फशन ज्वेलरी, ...
या एक्झिबिशनमध्ये उप्पडा, बनारसी, सिल्क, गढवाल, धर्मावरम, जमदानी, जमवार आणि संबलपुरी साड्या उपलब्ध आहे. साड्यांसह ड्रेस मटेरियल, फशन ज्वेलरी, गृहसजावटीच्या वस्तू, डिझाईनर कपडेदेखील उपलब्ध आहेत. देशातील १४ राज्यातील विणकरांनी तयार केलेले ५० हजारांपेक्षाही जास्त प्रकारचे कलाकुसर येथे प्रदर्शित केले आहेत. अगदी ५०० रुपयांपासून ते १५ हजार रुपये किमतीचे कॉटन आणि सिल्कचे कपडे येथे उपलब्ध आहेत. शिवाय डोक्रा ट्रायबल दागिने आणि चन्ना पटना खेळणी लोकांना आकर्षित करत आहेत. कोरोना नियमांचे पालन करून हे एक्झिबिशन सुरू आहे. एक्झिबिशनमध्ये मास्क बंधनकारक आहे, तसेच प्रवेशद्वारावरच सनिटायझेशन सुविधा ठेवली आहे.
या एक्झिबिशनमुळे विणकाम क्षेत्रातील कारागीर आपपल्या क्षेत्रातील सिल्क व कॉटनचे कपडे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत, त्यामुळे ग्राहकांची सोय होणार आहे. विविध भागातील विणकरांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या मालाला व्यासपीठ मिळवून देणे, हे एक्झिबिशनचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सिल्क इंडिया दुर्गा पूजा स्पेशल कलेक्शनचे आयोजक मानस आचार्य यांनी सांगितले.