कोरोनाकाळात नैराश्येत अडकलेल्या तरुणांना युवा रिफ्रेश देणार नवी दिशा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 2, 2020 04:35 PM2020-12-02T16:35:18+5:302020-12-02T16:38:12+5:30
कोरोना काळात ज्या तरुणांना नैराश्य आले अशांना रिफ्रेश करून त्यांच्यात नवीन उमेद निर्माण केली जाणार आहे.
ठाणे : वुई आर फॉर युच्या माध्यमातून आपल्या ठाण्यातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याचं काम गेली ८ ते ९ महिने किरण नाकती व त्यांचे सेवेकरी करीत आहेत.त्याचप्रमाणे *१ डिसेंबर २०२०* पासून वुई आर फॉर यु च्या माध्यमातून " *युवा रिफ्रेश* " हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी सुरू करण्यात आले .
या विभागाची सुरुवात ठाण्यातून होणार असून त्याकरिता *'नव्या पिढीला नवी दिशा देऊ या, वुई आर फॉर यु ला कनेक्ट होऊ या'* असं म्हणत कोरोनाकाळात नैराश्य पदरी आलेल्या, आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या ,आत्मविश्वास गमावलेल्या तसेच नकारात्मक विचार मनात येणाऱ्या तरुण-तरुणींना सुमपदेशन(कौन्सिलिंग) करण्यासाठी " *युवा रिफ्रेश* "या समुपदेशन विभागाची सुरुवात करण्यात आली.आज या कोरोनाकाळात कुणी कुणाचा भाऊ, कुणाचे वडिल, कुणाची होणारी पत्नी,कुणाचा बालपाणीचा मित्र गमावला आहे.यांना त्या नकारात्मक विचारातून बाहेर काढून पुन्हा आत्मविश्वास देण्यासाठी ,पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी या विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या विभागाचे उदघाटन *युवा खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे* यांच्या हस्ते करण्यात आले. युवा रिफ्रेश मुळे युवा वर्गाला मानसिक बळ मिळेल,तसेच नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडून एका नव्या सकारात्मक विचाराकडे प्रेरित होण्याची ऊर्जा मिळेल.याची सुरुवात ठाणेजिल्ह्यापासून करीत आहोत.भविष्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात युवा रिफ्रेश पोहचणार आहे.या माध्यमातून तरुणांना नवी दिशा मिळेल.अशी माहिती युवा रिफ्रेशचे निर्माते किरण नाकती यांनी दिली. पोस्ट कोव्हीडच्या या वातावरणात मानसिकरित्या रिहाबिलेशनचे काम युवा रिफ्रेश करेल.युवा वर्ग आधीपासूनच इथे आहेच परंतु या माध्यमातून आणखीन मोठ्या संख्येने युवा रिफेशमुळे जोडला जाईल. युवा रिफ्रेशच्या माध्यमातून असंख्य तरुणांना मानसिक आधार मिळण्याचं कार्य होणार आहे असे डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेे.