कल्याण पश्चिमेत नवे, जुने यांच्यातच बिग फाइट
By Admin | Published: October 27, 2015 12:17 AM2015-10-27T00:17:59+5:302015-10-27T00:17:59+5:30
कल्याण-डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत अनेक चुरशीच्या झुंजी बघायला मिळणार असून कल्याण पश्चिम भागातील प्रभाग- १५, १६, १७, १८, २० आणि २१ या सहा प्रभागांत
अरविंद म्हात्र, चिकणघर
कल्याण-डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत अनेक चुरशीच्या झुंजी बघायला मिळणार असून कल्याण पश्चिम भागातील प्रभाग- १५, १६, १७, १८, २० आणि २१ या सहा प्रभागांत विद्यमान प्रस्थापित नगरसेवकांसमोर नवख्या उमेदवारांनी प्रचंड आव्हान उभे केल्याने या सहाही प्रभागांत ‘बिग फाइट’ रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या गणेश कोट प्रभाग १५ (शहाड) यांना सुरेश जाधव (भाजपा) यांनी कडवे आव्हान उभे केले आहे, तर प्रभाग १६ (घोलपनगर) मध्ये शिवसेनेचे वजनदार नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्यासमोर भाजपाचे शहराध्यक्ष अर्जुन म्हात्रे यांनी चुरस निर्माण केली असून राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रभाव नसल्याने सेना-भाजपातच फाइट आहे. याचबरोबर प्रभाग १७ (बिर्ला कॉलेज) मध्ये मनसेला सोडून भाजपात आलेल्या लक्ष्मी बोरकर आणि शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख छाया वाघमारे यांच्यात कडवी लढाई बघायला मिळते. तर, प्रभाग १८ (खडकपाडा) येथेही काँग्रेसच्या अर्जुन भोईरांनी भाजपात येऊन तिकीट मिळवले असून विद्यमान नगरसेवक उल्हास भोईर (मनसे) यांच्यात चुरस आहे. येथे शिवसेनेचा नवखा उमेदवारही झूंज देतो आहे.