घोडबंदर, चिराग नगर आणि देसाई गावात महापालिकेची नवीन अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 04:06 PM2018-07-23T16:06:47+5:302018-07-23T16:09:48+5:30

ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे १४ फायर स्टेशनची आवश्यकता आहे. त्यानुसार आता नव्याने तीन फायर स्टेशन येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच मान्यता मिळाली असून पावसाळ्यानंतर केंद्राच्या कामांना सुरवात होणार आहे.

A new fire station of the municipality in Ghodbunder, Chirag Nagar and Desai village | घोडबंदर, चिराग नगर आणि देसाई गावात महापालिकेची नवीन अग्निशमन केंद्र

घोडबंदर, चिराग नगर आणि देसाई गावात महापालिकेची नवीन अग्निशमन केंद्र

Next
ठळक मुद्देवाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तीन नवीन फायर स्टेशनदिव्यातील देसाई गावातही नवीन केंद्र

ठाणे - मान्सूनमध्ये घडणाऱ्या आत्पतींचा सामना करण्यासाठी आणि प्रतीसाद कालावधी कमी करण्याच्या दृष्टीकोणातून ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मान्सूनच्या कालावधीसाठी तीन तात्पुरती बीट फायर स्टेशन कार्यान्वित केली आहेत. परंतु आता त्यातील ओवळा येथील फायर स्टेशन कायम स्वरुपी उभारण्यात येणार आहे. तसेच चिराग नगर आणि देसाई गाव येथे देखील नव्याने कायमस्वरुपी फायर स्टेशन सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता येत्या काही महिन्यात ही स्टेशन सुरु होतील असा विश्वास ठाणे अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
                      ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला २२ लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येला १४ फायर स्टेशनची गरज आहे. परंतु सध्या ६ फायरस्टेशन कार्यान्वीत असून, आता नव्याने तीन फायरस्टेशन नव्याने तयार होणार आहे. तसेच आनंद नगर, माजिवडा, दिवा, रुस्तमजी, हिरानंदानी इस्टेट, देसाई गाव आदी ठिकाणी देखील फायर स्टेशन मंजूर झाली असून त्यांच्या कामांच्या वर्कआॅर्डर देखील काढण्यात आल्या आहेत. परंतु या सर्व फायरस्टेशनची कामे पावसाळ्यानंतर सुरु केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
दरम्यान पावसाळ्यासाठी घोडबंदर भागातील ओवळा (कावेसर) भागात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेले अग्निशमन केंद्र आता कायमस्वरुपात सुरु करण्यात येणार आहे. येथील आरक्षित भुखंडावर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ६.७७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच चिराग नगर येथील सर्व्हीस रस्ता भागातील आरक्षित भुखंडावर देखील नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ०७ लाख ९९ हजार ९०१ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर दिव्या पाठोपाठ देसाई गाव येथे देखील अशा प्रकारे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. दिवा आणि आजूबाजूची लोकसंख्या वाढत असल्याने येथे केवळ मुंब्य्राचेच अग्निशमन केंद्र सध्या अस्तित्वात आहे. परंतु एखादी घटना घडल्यास येथील केंद्रातून गाडी जाण्यासाठी तासाचा अवधी जात होता. त्यामुळे या भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येथे दिव्या पाठोपाठ देसाई गावात देखील नव्याने केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ३० लाख ९६ हजार १७ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर या केंद्राच्या कामांना सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.



 

Web Title: A new fire station of the municipality in Ghodbunder, Chirag Nagar and Desai village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.