ठाण्यात कोरोनाच्या 1221 रुग्णांची नव्याने वाढ; 32 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:17 PM2020-08-28T20:17:42+5:302020-08-28T20:18:02+5:30
ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 197 नवे रुग्ण सापडले आहेत.
ठाणे: जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार 221 रुग्ण शुक्रवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख 20 हजार 132 रुग्ण संख्या झाली आहे.आज 32 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार 455 मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे.
ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 197 नवे रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात कोरोनाच्या 25 हजार 273 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 819 झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत 244 रुग्ण नव्याने आढळून आले. तर नऊ जणांचा आज मृत्यू झाला. आता या शहरातील मृतांची संख्या 601झाली. तर 27 हजार 928 रुग्ण बाधीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नवी मुंबईला 408 रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 24 हजार 993 तर, मृत्यूची संख्या 571 झाली आहे. उल्हासनगरला आज केवळ 20 रुग्ण सापडले असून शहरात आतापर्यंत सात हजार 688 बाधीत रुग्णां झाले. तर आज दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे 222 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.
भिवंडी मनपा क्षेत्रात आज फक्त 27 रुग्ण सापडले असून एकचा मृत्यू आज झाला नाही. या शहरात आजपर्यंत चार हजार 152 बाधीतांची तर 283 मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरलाही केवळ 149 रुग्णांची तर दोन जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात बाधीत 12 हजार 199, तर 418 मृतांची आज नोंद झाली आहे.
अंबरनाथला आज 52 रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता चार हजार 862 बाधीत तर, 182 मृतांची नोंद केली आहे. बदलापूरला आज 37 रुग्ण आज सापडे आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण तीन हजार 989 झाले आहेत. आज या शहरात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या 69 झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्र आज 87 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधीत नऊ हजार 48 तर मृतांची संख्या 290 वर गेली आहे.