कोरोनाच्या १,३८८ रुग्णांची नव्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:27 AM2020-09-23T00:27:07+5:302020-09-23T00:27:11+5:30

ठाणे जिल्ह्यात ३३ जणांचा मृत्यू : आरोग्य यंत्रणेने दिली माहिती

New increase of 1,388 corona patients | कोरोनाच्या १,३८८ रुग्णांची नव्याने वाढ

कोरोनाच्या १,३८८ रुग्णांची नव्याने वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ३८८ नव्या रुग्णांची मंगळवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ६१ हजार ६५९ झाली आहे. तर ३३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता चार हजार २०५ वर गेली आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२२ रुग्ण नव्याने आढळले. शहरात ३३ हजार ५२५ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर चार मृत्यू झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ९४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात २९६ रुग्णांच्या वाढीसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३९ हजार ४६८ रुग्ण बाधित झाले असून मृतांची संख्या ७८० झाली आहे.


नवी मुंबईत २६४ रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या ३३ हजार ७५५ तर, मृतांची संख्या ७१० वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात तीन जणांचा मृत्यू झाला असून ४८ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत मृतांची संख्या २७५ तर आठ हजार ७४८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.


भिवंडी महापालिका क्षेत्रात ३३ बाधित आढळले. तर एका मृत्यूची नोंद करण्यात आली. आता बाधितांची संख्या चार हजार ७८२ झाली असून मृतांची संख्या ३०२ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १८५ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १६ हजार ८८६ झाली असून मृतांची संख्या ५२३ झाली आहे.


अंबरनाथमध्ये २५ रुग्णांची वाढ तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आता बाधितांची संख्या पाच हजार ८७३ तर मृतांची संख्या २१८ झाली आहे. बदलापूरमध्ये ४७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ६६३ झाली. या शहरात मंगळवारी एकही मृत्यू झालेला नाही. यामुळे त्यांची संख्या ७६ कायम आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात मंगळवारी १६८ रुग्णांची वाढ झाली तर पाच मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आता बाधितांची संख्या १२ हजार ९५९ आणि मृतांची संख्या ३७९ झाली आहे.

Web Title: New increase of 1,388 corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.