ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1844 रुग्णांची नव्याने वाढ, 25 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 08:00 PM2020-09-11T20:00:22+5:302020-09-11T20:00:31+5:30
नवी मुंबई महापालिकेत 359 रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 29 हजार 914 झाली आहे. तर, मृतांची संख्या 650 वर गेली आहे
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार नव्या 844 रुग्णांची शुक्रवारी नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख 42 हजार 93 झाली आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता तीन हजार 867 झाली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 379 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात 29 हजार 463 कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज ही पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 885 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात 588 रुग्णांची आज वाढ झाली असून सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 34 हजार 108 रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या 715 झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेत 359 रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 29 हजार 914 झाली आहे. तर, मृतांची संख्या 650 वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज एकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 246 तर बाधीत रुग्ण आठ हजार 168 झाले आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात आज 25 बधीत आढळून आले. तर आज एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या चार हजार 434 झाली असून मृतांची संख्या 295 झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज 193 रुग्णांची तर, चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या 14 हजार 789 झाली, तर, मृतांची संख्या 464 झाली आहे.
अंबरनाथमध्ये आज 42 रुग्णांची वाढ तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या पाच हजार 396 झाली. तर, मृतांची संख्या 203 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 82 रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 828 झाली. या शहरात आज एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या 73 झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात 151 रुग्णांची वाढ झाली. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या दहा हजार 993 आणि मृतांची संख्या आजपर्यंत 336 आहे.