ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 789 रुग्णांची नव्याने वाढ; 47 रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 08:05 PM2020-08-25T20:05:28+5:302020-08-25T20:05:34+5:30
ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 129 नवे रुग्ण सापडले आहेत.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे 789 रुग्ण मंगळवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख 16 हजार 413 रुग्ण संख्या झाली आहे. आज 47 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार 348 मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे.
ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 129 नवे रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात कोरोनाच्या 24 हजार 713 रुग्णांची नोंद झाली आहे.याशिवाय सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 799 झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात 101 रुग्ण नव्याने आढळून आले. तर आठ जणांचा आज मृत्यू झाला. आता या शहरातील मृतांची संख्या 573 झाली. तर 26 हजार 918 रुग्ण बाधीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नवी मुंबईला 298 रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 23 हजार 927 तर, मृत्यूची संख्या 551 झाली आहे. उल्हासनगरला आज केवळ 12 रुग्ण सापडले असून शहरात आतापर्यंत सात हजार 611 बाधीत रुग्णां झाले. तर आज चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे 217 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.
भिवंडी मनपा क्षेत्रात आज फक्त 13 रुग्ण सापडले असून एकही मृत्यू आज झाला नाही. या शहरात आजपर्यंत चार हजार 89 बाधीतांची तर 281मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरलाही केवळ 89 रुग्णांची तर आठ जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात बाधीत 11हजार 760, तर 404 मृतांची आज नोंद झाली आहे.
अंबरनाथला आज 20 रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा ही मृत्यू झाला नाही. या शहरात आता चार हजार 733 बाधीत तर, 180 मृतांची नोंद केली आहे. बदलापूरला आज 31 रुग्ण आज सापडे आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण तीन हजार 867 झाले आहेत. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या 67 झाली आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्र आज 96 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधीत आठ हजार 795 तर मृतांची संख्या 276 वर गेली आहे.