नवी मोलकरीण काही तासांत पैसे, दागिने घेऊन झाली फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:19 AM2019-05-31T02:19:48+5:302019-05-31T02:20:01+5:30
नव्या मोलकरणीने अवघ्या काही तासांतच घर साफ केल्याची घटना भाईंदरपाडा येथे गुरूवारी घडली
ठाणे : जुनी मोलकरीण मूळगावी गेल्याने तिच्याजागी आलेल्या नव्या मोलकरणीने अवघ्या काही तासांतच घर साफ केल्याची घटना भाईंदरपाडा येथे गुरूवारी घडली. या घटनेत रोख तीन लाखांसह दोन लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लंपास केला.
तक्रारदार स्वप्ना पटनायक या पती आणि मुलांसह घोडबंदर रोड, भाईंदरपाडा येथे भाड्याने राहतात. त्यांच्याकडे काम करणारी उषा ही मोलकरीण २६ मे रोजी कामाला न आल्याने सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड लक्ष्मण फोंडे याला दुसरी कोणीतरी महिला असेल, तर तिला घरी घरकामासाठी पाठवा, असे सांगितले. २८ मे रोजी सकाळी ९ वाजता उषा ही तिच्या मूळगावी जाण्यासाठी केलेल्या कामांचे पैसे मागण्यासाठी आली. तिला पैसे दिल्यानंतर ती निघून गेली. त्यानंतर, ११ वाजण्याच्या सुमारास फोंडे याने घरी घरकाम करणारी आशा हिला पाठवले. याचदरम्यान तक्रारदार पटनायक यांची मैत्रीण घरी आली होती. त्या दोघींच्या गप्पागोष्टी हॉलमध्ये चालू असताना आशा ही दुपारी १२ च्या सुमारास एक महत्त्वाचे काम आहे. मी घरी जाऊन पुन्हा येते, असे सांगून घाईघाईत निघून गेली. ती घाईत गेल्याने शंका आल्याने पटनायक यांनी गेस्ट रूमधील लोखंडी कपाट पाहिले़