रताळ्याचा किस, साबुदाण्याची खीर, श्रावण यम्मी अ‍ॅण्ड टेस्टी करण्याकरिता नवनवीन पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:40 AM2018-08-12T02:40:38+5:302018-08-12T02:41:04+5:30

श्रावण महिन्यात ठाणेकरांसाठी यंदा उपाहारगृहांत नवनवीन पदार्थांची एण्ट्री झाली आहे. ठाणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दरवर्षी उपाहारगृहांत वेगवेगळे प्रयोग केले जातात.

New menu to make sweet Shravan | रताळ्याचा किस, साबुदाण्याची खीर, श्रावण यम्मी अ‍ॅण्ड टेस्टी करण्याकरिता नवनवीन पदार्थ

रताळ्याचा किस, साबुदाण्याची खीर, श्रावण यम्मी अ‍ॅण्ड टेस्टी करण्याकरिता नवनवीन पदार्थ

Next

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - श्रावण महिन्यात ठाणेकरांसाठी यंदा उपाहारगृहांत नवनवीन पदार्थांची एण्ट्री झाली आहे. ठाणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दरवर्षी उपाहारगृहांत वेगवेगळे प्रयोग केले जातात. यंदा खवय्यांचा उपवास ‘यम्मी अ‍ॅण्ड टेस्टी’ व्हावा, यासाठी रताळ्यांचा किस, वऱ्याचे तांदूळ आणि साबुदाण्यापासून तयार केलेली खीर आणि मिनीलंचचा समावेश केला आहे. तसेच, नियमित पदार्थांचे मेन्यूकार्ड चाळून खवय्यांना उपवासाच्या पदार्थांची शोधाशोध करावी लागणे टाळण्यासाठी या पदार्थांचे वेगळे स्टॅण्डी लावण्यात येणार असल्याचे उपाहारगृहांच्या मालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
श्रावण महिन्यानिमित्त उपवासाच्या पदार्थांची उपलब्धता झाली. साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रूट मलाई मटका लस्सी, साबुदाणा खिचडी, वºयाची खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालिपीठ, उपवासाची मिसळ, उपवासाची कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल, उपवासाची भाजणी, कचोरी, साबुदाणावडा, उपवासाचा बटाटावडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, खरवस, उपवासाची पुरीभाजी, उपवासाची इडली, उपवास स्टफ पॅकेज, मसाला दूध, लस्सी, पीयूष यासारख्या पदार्थांबरोबर रताळचा किस, मिनीलंच आणि उपवासाची खीर बनवण्यात येणार आहे. हे सर्व पदार्थ सोमवारपासून उपलब्ध होतील, असे एका उपाहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले.

सोबत पार्सल नेण्यास पसंती
पार्सलमध्ये खिचडी, मिसळ, थालिपीठ, कचोरी हे पदार्थ नेण्यावर खवय्यांचा भर असतो. दुपारच्या वेळेस उपाहारगृहांमध्ये जास्त गर्दी होत असली, तरी संध्याकाळी हे पदार्थ पार्सल नेणेच पसंत करतात.

श्रावणात साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालिपीठ, बटाटा-रताळ्याचे काप हे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्यांच्या पसंतीला हे नवीन पदार्थ नक्कीच उतरतील. श्रावण महिन्यात सोमवार, गुरुवार आणि शनिवारीच हे पदार्थ उपलब्ध असतील.
- केदार जोशी, उपाहारगृहाचे मालक

Web Title: New menu to make sweet Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.