अर्जांसाठी अमावस्या आली आड
By admin | Published: January 28, 2017 02:47 AM2017-01-28T02:47:49+5:302017-01-28T02:47:49+5:30
युती तुटली आणि आघाडीची बोलणी अद्यापही आठ जागांवर अडलेली असली तरी ठाण्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे.
ठाणे : युती तुटली आणि आघाडीची बोलणी अद्यापही आठ जागांवर अडलेली असली तरी ठाण्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. परंतु अमावस्या असल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाने दिली. ३ फेबु्रवारीपर्यंत अर्ज भरायचे आहेत. मंगळवारच्या गणेश जयंतीनंतर अर्ज भरण्यास सुरूवात होईल.
बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचे बहुतांश अर्ज शेवटच्या दोन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून छोटे पक्ष, अपक्षांचेच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइंचे गट, एमआयएम आणि बंडखोरांचे
अर्ज शेवटच्या दोन दिवसांत
भरले जाण्याची शक्यता आहे. अमावास्येचा दिवस अशुभ असल्याकारणाने नाकारला असला तरी गणेश जयंतीचा चांगला मुहूर्त किती लाभतो, हे येणारा काळच ठरवेल. (प्रतिनिधी)