तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, कल्याणजवळच्या 14 गावांना हादरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:41 AM2018-10-29T10:41:15+5:302018-10-29T13:44:43+5:30
तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे.
नवी मुंबई/कल्याण : तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खणताना सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये जेसीबी चालवणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.अग्निशमन दलदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे कल्याणजवळच्या 14 गावांना भूकंपसदृश्य हादरे बसले आहेत. अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून भीतींना तडेदेखील गेले आहेत.
- आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली.
Fire breaks out at Mumbai waste management company in Taloja Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area in Navi Mumbai. Fire tenders present at the spot. One worker injured. More details awaited. #Maharashtrapic.twitter.com/vRfHbQCrDi
— ANI (@ANI) October 29, 2018
#Maharashtraनवी मुंबई : तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट, कल्याणजवळच्या 14 गावांना भूकंपसदृश्य हादरे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 29, 2018
#Maharashtra नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट, दोन कामगार जखमी
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 29, 2018