ठाण्यात नवीन रेल्वे स्टेशनसाठी १९४ काेटी खर्चुन इमारती,फलाटांची कामे नवीन वर्षात लागणार मार्गी!

By सुरेश लोखंडे | Published: January 1, 2024 04:12 PM2024-01-01T16:12:18+5:302024-01-01T16:13:02+5:30

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनसह मनाेरूग्णालयाजवळील ठाणे, मुलुंड दरम्यानच्या प्रस्तावित नवीन रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहाणी खासदार राजन विचारे यांनी केली.

new railway station in thane at a cost of 194 crores the work of the building along with the platforms will be on the way in the new year | ठाण्यात नवीन रेल्वे स्टेशनसाठी १९४ काेटी खर्चुन इमारती,फलाटांची कामे नवीन वर्षात लागणार मार्गी!

ठाण्यात नवीन रेल्वे स्टेशनसाठी १९४ काेटी खर्चुन इमारती,फलाटांची कामे नवीन वर्षात लागणार मार्गी!

सुरेश लोखंडे,ठाणे : येथील ऐतिहासिक ठाणेरेल्वे स्टेशनसह मनाेरूग्णालयाजवळील ठाणे, मुलुंड दरम्यानच्या प्रस्तावित नवीन रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहाणी खासदार राजन विचारे यांनी केली.या नवीन स्टेशनसाठी लागणारी बिल्डिंग व फलाटे, रेल्वे रूळ इत्यादी चार एकर जागेवर रेल्वे स्वता: कामे करणार आहे. यासाठी १९४ कोटी खर्च होणार आहे. मात्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून आजपर्यंत ही जागा रेल्वे विभागाला हस्तांतरित न झाल्याने या कामाला सुरुवात होण्यास विलंब लागल्याचे या पाहाणी दाैऱ्या प्रसंगी निदर्शनास आले. परंतु या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासीक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पाहणी दरम्यान विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची विस्तृत चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली. त्यावेळी त्यांनी या दाेन्ही रेल्वे स्टेशनचे कामे या नवीन वर्षात सुरू करण्याचे सुताेवाच केले. त्यांच्या या दाैऱ्यात मध्य रेल्वेचे डी. जी. एम. दीपक शर्मा, आरएलडीएचे डीजीएम, एडीएन कल्याण, स्टेशन डायरेक्टर अरुण प्रताप, आर पी एफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वेचे व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आण ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील दररोज प्रवास करणाऱ्या आठ लाख प्रवाश्यांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था कशी करता येईल याबाबत चर्चा या दाैऱ्यात झाली. फलाटावर डेकचे काम सुरू असताना खालील फलाटावर प्रवासी असल्यास काम करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता फलाट बंद करून दुसऱ्या फलाटावरून गाड्या सोडता येऊ शकतील यावर चर्चा झाली.

मनाेरूग्णालयाच्या जागेवर होणारे नवीन रेल्वे स्टेशन, ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या रेल्वे स्टेशनचे काम मार्गी लागल्यास प्रवाश्यांचा अतिरिक्त पडणारा भार कमी होऊ शकेल. यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशनातील सुरू झालेल्या परिचलन क्षेत्रातील विकास कामांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्टेशनकडे जाणारे ३ मार्ग विकसित करण्याचे काम सुरु आहे. पहिला मार्ग ज्ञानसाधना कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा, दुसरा मार्ग धर्मवीर नगराकडून स्टेशनकडे जाणारा, तिसरा मार्ग मुलुंड चेकनाका मॉडेला मिल कडून स्टेशनकडे जाणार आहे. या तीन मार्गिकांचे काम सुरु असून स्टेशन डेक, पार्किंग, व कंपाऊंड वॉल चे काम देखील तितक्याच गतीने सुरु आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालेले आहे. या वर्षे अखेर हेत पूर्ण करण्यात येईल, याविषयी या चाैऱ्यात चर्चा झाली.

त्या ठिकाणी काही सहकारी गृहनिर्माण संस्था एस आर ए प्रकल्पास परवानगी मिळण्याकरिता न्यायालयात दाद मागण्यात आलेली आहे. त्यामुळे या कामाला गती प्राप्त होत नाही. गेले ७ ते ८ महिन्यापासून तयार झालेले दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण थांबवून प्रवाशांना वेटीस धरण्याची खंत विचारे यांनी व्यक्त केली आहे. या नवीन वर्षात देव त्यांना सद्बुद्धि देवो व दिघा गाव रेल्वे स्टेशन सुरु होऊदे ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना ही त्यांनी यावेळी बाेलून दाखवली.

नवीन पादचारी पूल हाेणार खुले :

रेल्वे प्रवाश्यांना अपुरे पडणाऱ्या पादचारी पुलाची संख्या लक्षात घेता मुंबई व कल्याण दिशेकडील दोन नवीन पादचारी पूल महापालिकेकडून मंजूर करून रेल्वे कडून बांधून घेतले आहे. याचीही पाहणी या दाैऱ्याप्रसंगी केली आहे. आता हे दोन पादचारी पूल २६ जानेवारी पर्यंत खुले करून देणार असे रेल्वे अधिकाऱ्यांनी विचारे यांना आश्वासन दिले आहे.

Web Title: new railway station in thane at a cost of 194 crores the work of the building along with the platforms will be on the way in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.