१९४ काेटी खर्चून हाेणार नवे ठाणे स्थानक; चार एकर जागेवर रेल्वे करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:56 PM2024-01-02T13:56:01+5:302024-01-02T13:56:54+5:30
या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासिक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले. विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली.
ठाणे : येथील ऐतिहासिक ठाणेरेल्वे स्टेशनसह मनाेरुग्णालय जवळील ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या प्रस्तावित नवीन रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी केली. या नवीन स्टेशनसाठी लागणारी बिल्डिंग व फलाट, रेल्वेरूळ इत्यादी चार एकर जागेवर रेल्वे स्वत: कामे करणार आहे. यासाठी १९४ कोटी खर्च होणार आहेत.
या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासिक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले. विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली.
- ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवास करणाऱ्या आठ लाख प्रवाशांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था याबाबतही चर्चा झाली.
- राज्य सरकारकडून ही जागा रेल्वे विभागाला हस्तांतरित न झाल्याने कामाला विलंब झाल्याचे या पाहणी दाैऱ्याप्रसंगी निदर्शनास आले.
दिघा स्थानकाचे लोकार्पण रखडले
काही सहकारी गृहनिर्माण संस्थांनी एसआरए प्रकल्पास परवानगी मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे या कामाला गती प्राप्त होत नाही. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण रखडल्याबद्दल खासदार राजन विचारे यांनी खंत व्यक्त केली आहे.