उंबर्डे प्रकल्पात नवा कचरा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:35 AM2020-10-10T01:35:02+5:302020-10-10T01:35:11+5:30

येरे माझ्या मागल्या; आधारवाडी डम्पिंगवर पुन्हा ढिगारे

New waste closed at Umberde project | उंबर्डे प्रकल्पात नवा कचरा बंद

उंबर्डे प्रकल्पात नवा कचरा बंद

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने उभारलेल्या उंबर्डे कचरा प्रकल्पात नव्याने कचरा घेणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कचरा पुन्हा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरच टाकला जात आहे. कचरासमस्या सोडवण्यासाठी प्रकल्प उभारूनही आधारवाडी डम्पिंग बंद होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे येरे माझ्या मागल्या, अशीच स्थिती कचरा व्यवस्थापनाविषयी दिसून येत आहे.

आधारवाडी डम्पिंगवरील कचरा टाकण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे हे डम्पिंग बंद करण्यासाठी मनपाने पर्यायी प्रकल्प उभारले आहेत. त्यापैकी बारावे प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर, उंबर्डे प्रकल्प हा ३५० मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. मात्र, तो लोकवस्तीपासून जवळ असल्याने दुर्गंधी येत असल्याने तेथील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. तरीही महापालिकेने हा प्रकल्प राबविला आहे.

आधारवाडी येथे दररोज ५७० मेट्रीक टनपेक्षा जास्त कचरा टाकला जातो. त्यापैकी २०० टन कचरा उंबर्डे प्रकल्पात प्रक्रियेसाठी टाकला जात होता. त्यामुळे आधारवाडी येथे कमी कचरा टाकला जात होता. परंतु, उंबर्डे कचरा प्रकल्पाचा नागरिकांना त्रास होत असल्याने या प्रकल्पात नव्याने कचरा घेण्याचे काम बंद करण्यात आले आहे. या वृत्ताला प्रशासनानेदेखील दुजोरा दिला आहे. परिणामी, २०० टन कचरा पुन्हा आधारवाडी येथे टाकला जात आहे. दरम्यान, उंबर्डे प्रकल्पात आतापर्यंत टाकलेल्या अडीच हजार मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. मात्र, आधारवाडी डम्पिंगवर पुन्ह कचरा टाकला जात असल्याने ते बंद करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करता येणार नाही.

कोरोनामुळे डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य पडले मागे
आधारवाडी डम्पिंगवरील कचरा बायो मायनिंग पद्धतीने डम्प केला जाईल. तसेच डम्पिंगवर उद्यान फुलविले जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगतानाच हे डम्पिंग मे महिन्यात बंद करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य मागे पडले आहे.

Web Title: New waste closed at Umberde project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा