नव्या वर्षात ठाणेकर वळले पुन्हा एकदा बोटिंगकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:40 AM2021-01-06T00:40:32+5:302021-01-06T00:41:09+5:30
ताणतणावातून बाहेर येण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या ताणतणावातून बाहेर येण्यासाठी ठाणेकर नव्या वर्षात बोटिंगकडे वळले आहेत. लॉकडाऊन काळात ठाणेकरांचे बंद पडलेले बोटिंग पुन्हा सुरू झाले आहे. नव्या वर्षाच्या चार दिवसांत १२७ ठाणेकरांनी मासुंदा तलावात बोटिंगचा आनंद घेतला. बोटिंगसाठी येणाऱ्या कुटुंबांची संख्या पुन्हा वाढली आहे.
शनिवार-रविवार किंवा एखाद्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी ठाणेकरांचे हमखास फिरण्याचे ठिकाण म्हणजे तलावपाळी. या ठिकाणी मासुंदा तलावात बोटिंगची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये आस्थापनांबरोबर बोटिंगही बंद केले. डिसेंबर महिन्यात बोटिंग सुरू केले असले तरी कोरोनामुळे पहिल्यासारखे लोक येत नसल्याचे येथील व्यवस्था पाहणाऱ्यांनी सांगितले. कोरोनामुळे येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासले जात आहे, सॅनिटायझरचीदेखील व्यवस्था केली आहे. ठाणेकरांसोबत संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की, नववर्ष सुरू झाल्यावर कोरोनाचा ताण घालविण्यासाठी आम्ही बोटिंगसाठी कुटुंबासमवेत आलो आहोत. दर महिन्याला किंवा शनिवार-रविवारी हमखास लहान मुलांना घेऊन बोटिंगला येत अस
२९९
ठाणेकरांनी डिसेंबर महिन्यात बोटिंग केली. लॉकडाऊनआधी महिन्याला दीड हजारावर ठाणेकर बोटिंगला येत. हळुहळु हे प्रमाण वाढेल, असे येथील व्यावसायिकांना वाटते.
मुलांच्या मनोरंजनासाठी आम्ही बोटिंग केली
खूप दिवसांनी आल्याने पहिल्यासारखे वाटत आहे. कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले असल्याने या व्यवसायालाही हातभार लागला पाहिजे. लॉकडाऊनआधी दर आठवड्याला शनिवार-रविवारी यायचो.
- प्रीतिका गावडे
बोटिंग केल्यावर जुने दिवस आठवले. घराबाहेर पडल्याने ताजेतवाने वाटत आहे. लॉकडाऊनआधी महिन्यातून एकदा बोटिंग करायचो. एक वर्षाआधी ती केली होती.
- दीपक सोनार
याआधी आठवड्यातून एकदा तरी बोटिंगला यायचो. आज बोटिंगला जायचे ठरविले. गर्दी कमी असल्याने मजा येत नाही.
- शैलेश कदम