शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:44 AM2019-05-06T05:44:29+5:302019-05-06T05:44:43+5:30

भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

 Newborn infant deaths in government hospital | शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

Next

मीरा रोड : भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

भार्इंदर पुर्वेच्या इंद्रलोक फेस २ मध्ये राहणाराया मंगला विक्रम चाड यांना प्रसुती वेदना होऊ लागल्याने शनिवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात सोनोग्राफी सुरु नसल्याने त्यांना फाटकाजवळील एका बिल्डरने सुरु केलेल्या सोनोग्राफी केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथे सोनोग्राफी करुन झाल्यानंतर त्या परत रुग्णालयात आल्या. ५ मे रोजीच्या पहाटे दीडच्या सुमारास मंगला बाळंत झाल्या. पण बाळ हालचाल करत नव्हते. डॉक्टरांनी प्रयत्न करुनदेखील हालचाल नसल्याने बाळास मृत घोषित करण्यात आले.

चाड दाम्पत्यास दहा वर्षांनी पहिल्यांदाच बाळ झाले होते. पण ते मृत झाल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली. दरम्यान, इतक्या मोठ्या रुग्णालयात सोनोग्राफी सुरु नसल्याने पत्नीस त्या अवस्थेतदेखील खाजगी केंद्रात सोनोग्राफीसाठी पाठवण्यात आले. परंतु तेथे जाण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. सोनोग्राफीचा अहवाल व्यवस्थित होता. मग बाळ मृत कसे झाले, असे सांगत विक्रम यांनी प्रशासन बाळाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

नवघर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक विजय टक्के हे तपास करत आहे. पालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांच्याशी महापालिकेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी कॉल घेतला नाही. रूग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याची बाब प्रशासनानाला सतत कळवली आहे. पण प्रशासनाकडूनच आवश्यक आयसीयू, एनआयसीयू आदी सुविधाच दिल्या जात नसल्याने डॉक्टरांनी तरी काय करायचे, असा सवाल एका डॉक्टरने केला. या आधीही जोशी रुग्णालयात काही रुग्णांचे मृत्यू झाले असून, याबाबत महापालिकेवर तसेच शासनावर सातत्याने आरोप होत आहेत.

Web Title:  Newborn infant deaths in government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू