उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी पदभार स्वीकारला

By सदानंद नाईक | Published: July 13, 2022 05:30 PM2022-07-13T17:30:00+5:302022-07-13T17:30:26+5:30

धोकादायक इमारती, रस्ते, पाणी यांना प्राधान्य देणार

Newly appointed Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation Aziz Shaikh took charge | उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी पदभार स्वीकारला

उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी पदभार स्वीकारला

googlenewsNext

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका आयुक्त पदाचा पदभार अजीज शेख यांनी मावळते आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडून बुधवारी दुपारी स्वीकारला. त्यांनी शहरातील धोकादायक इमारती, तुंबलेले नाले, पाणी समस्या, पाऊस याकडे लक्ष देणार असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच विविध विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या.

 उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना डॉ राजा दयानिधी यांची आयुक्त पदी नियुक्ती झाली. त्यांनी कोरोना काळात उत्तम काम करून शहराला कोरोनातून बाहेर काढले. मात्र त्यांनी नगरसेवक, नागरिक व पत्रकार यांच्या सोबत संपर्क ठेवला नसल्याने, त्यांच्या कामावर टीका होत होती. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या बदलीची चर्चा होती. 

नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी धुळे महापालिकेत आयुक्त म्हणून काम केले असून ७ वर्षांपूर्वी त्यांनी कल्याण महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केले. त्यांनी बुधवारी दुपारी आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्या नंतर धोकादायक इमारती, पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, पाऊसामुळे निमार्ण झालेली समस्या, नालेसफाई आदी कामाला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विभागावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्या कडून माहिती घेतली. 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर यांनी महापालिकेचे उपायुक्त, विभाग प्रमुख, अधिकारी तसेच इतर मान्यवरांचा परिचय करून दिला. महापालिका निवडणुकी पूर्वी अजीज शेख यांनी नियुक्ती झाल्याने, विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.

Web Title: Newly appointed Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation Aziz Shaikh took charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.