नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडवर; बदलापूरात रेल्वे प्रवासांशी साधला संवाद

By पंकज पाटील | Published: June 18, 2024 06:28 PM2024-06-18T18:28:50+5:302024-06-18T18:29:19+5:30

बदलापूर रेल्वे स्थानकातून महिला लोकल सुरू होईपर्यंत आणखी तीन डबे महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण केली असून यासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले

Newly elected MP Balya Mhatre on action mode; Interaction with railway travel in Badlapur | नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडवर; बदलापूरात रेल्वे प्रवासांशी साधला संवाद

नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडवर; बदलापूरात रेल्वे प्रवासांशी साधला संवाद

बदलापूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पाहिले पाऊल टाकत त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देत प्रवशांशी संवाद साधला.

मंगळवारी म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. निवडणुकीच्या पूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मच्या कामाची आपण पाहणी केली होती. त्यावेळी ३० मे पर्यंत हे काम पूर्ण होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे असल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे बाळ्या मामा यांनी सांगितले. ही कामे २०-२५ दिवसात पूर्ण करण्याचे तसेच तांत्रिक बाबीमुळे प्रलंबित असलेली कामे केव्हां पूर्ण होणार याची निश्चित तारीख रेल्वे अधिकारी दोन दिवसात कलवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बदलापूर रेल्वे स्थानकातून महिला लोकल सुरू होईपर्यंत आणखी तीन डबे महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण केली असून यासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांबाबत आपण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मॅनेजर धनश्री गोडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे, प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत आग्रही राहणार

बदलापूर रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्यानुसार स्वच्छता राखली जाते की नाही हे पाहण्यासाठी रेल्वे स्थानकात सरप्राइज व्हिजिट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले.

फलाटाचे अंतर कमी करणार

रेल्वे लोकल गाडी व फलाट यामधील अंतरामुळे लोकलमध्ये चढताना रेल्वे प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. फलाट व गाडीतील हे वाढलेले अंतर ही सर्वस्वी संबंधित विभागाची चूक आहे. त्यामुळे यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या

Web Title: Newly elected MP Balya Mhatre on action mode; Interaction with railway travel in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे