वृत्तपत्रविक्रेत्यांनाही हक्काची घरे मिळावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:46 AM2019-05-30T00:46:31+5:302019-05-30T00:46:34+5:30

ऊन, वारा, पावसात अखंडपणे वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचवणारे वृत्तपत्रविक्रेते कमालीचे दुर्लक्षित राहिले आहेत.

Newsletters will also get the rights to the sellers | वृत्तपत्रविक्रेत्यांनाही हक्काची घरे मिळावीत

वृत्तपत्रविक्रेत्यांनाही हक्काची घरे मिळावीत

Next

ठाणे : ऊन, वारा, पावसात अखंडपणे वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचवणारे वृत्तपत्रविक्रेते कमालीचे दुर्लक्षित राहिले आहेत. दारिद्र्यरेषेखाली राहिलेला हा वर्ग कमालीचा असंघटित व असुरक्षित आहे. पत्रकारांप्रमाणे वृत्तपत्रविक्रेत्यांनादेखील शासनाने हक्काची परवडणारी घरे द्यावी, अशी मागणी मंगळवारी ठाणे जिल्हा वृत्तपत्रविके्रता संघाचे अध्यक्ष कैलाश म्हापदी यांनी केली.
राज्यातील शेकडो पत्रकारांना सरकारी योजनांमध्ये घरे मिळाली. ठाण्यातही महापालिकेने पत्रकारांना परवडणारी घरे दिली आहेत. याच योजनेत गोरगरीब वृत्तपत्रविक्रेत्यांनाही घरे मिळावीत, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. सलग २० वर्षे आपल्या धडाकेबाज कामगिरीने ही संस्था ठाण्यात नावारूपाला आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे तसेच ज्येष्ठ विक्रेते जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून या तिसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन पार पडले. यावेळी दांगट वृत्तपत्रवितरण समूहाचे प्रमुख बाजीराव दांगट, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, संघटनेचे सचिव अजित पाटील यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर तसेच अनेक वृत्तपत्रविक्रे ता संघटना व वृत्तपत्रसमूहाचे पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते.

Web Title: Newsletters will also get the rights to the sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.