'अगला आमदार उत्तर भारतीय होगा', मराठी माणसाच्या हिसक्यानंतर बॅनर उतरवला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 07:44 PM2021-08-28T19:44:52+5:302021-08-28T19:45:46+5:30

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट येथील मुख्य रस्त्यावर विजवाहक टॉवर खाली ' मीरा भाईंदर का अगला आमदार कोई उत्तरभारतीय ही होगा ' अश्या आशयाचा जाहिरात फलक अनधिकृतपणे लावण्यात आला होता.

'Next MLA will be North Indian', action on controversial billboard | 'अगला आमदार उत्तर भारतीय होगा', मराठी माणसाच्या हिसक्यानंतर बॅनर उतरवला

'अगला आमदार उत्तर भारतीय होगा', मराठी माणसाच्या हिसक्यानंतर बॅनर उतरवला

Next
ठळक मुद्देस्थानिक भूमिपुत्र मराठी माणसांना डिवचण्यासाठी, स्वाभिमान दुखावून शहरातील शांतता भंग होऊन लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हावा या दुष्ट हेतूने अश्या प्रकारचा फलक लावण्यात आला असल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे व मराठी एकीकरण समितीने केली आहे.

मीरा रोड - बेकायदा जाहिरात फलक, होर्डिंग व कमानीच्या विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सातत्याने मुंबई उच्चन्यायालय देत असतानाच भाईंदर येथील ' अगला आमदार उत्तरभारतिय होगा ' असा मजकूर लिहलेल्या एका वादग्रस्त जाहिरात फलका वरून मराठी एकीकरण समिती व मनसे आक्रमक झाली. त्या अनुषंगाने पोलीस व पालिकेने बेकायदा जाहिरात फलक काढून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट येथील मुख्य रस्त्यावर विजवाहक टॉवर खाली ' मीरा भाईंदर का अगला आमदार कोई उत्तरभारतीय ही होगा ' अश्या आशयाचा जाहिरात फलक अनधिकृतपणे लावण्यात आला होता. अशा पद्धतीचा वादग्रस्त फलक लावल्याचे कळताच मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख व सहकारी तर मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत व मनसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी नवघर पोलीस व पालिके कडे केली. त्यानंतर सदर फलक पोलिसांनी काढायला लावला. 

स्थानिक भूमिपुत्र मराठी माणसांना डिवचण्यासाठी, स्वाभिमान दुखावून शहरातील शांतता भंग होऊन लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हावा या दुष्ट हेतूने अश्या प्रकारचा फलक लावण्यात आला असल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे व मराठी एकीकरण समितीने केली आहे. तर असा वादग्रस्त फलक लावून राजकारण तापवण्याची खेळी असण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होत आहे. 
 

Web Title: 'Next MLA will be North Indian', action on controversial billboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.