ठाणे जि.प.च्या गट क सरळसेवा भरतीचा पुढील टप्पा १८ जुलैपासून
By सुरेश लोखंडे | Published: July 11, 2024 05:45 PM2024-07-11T17:45:14+5:302024-07-11T17:46:17+5:30
या सरळ सेवा भरतीची परिक्षा १८ जुलै रोजी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांची हाेणार आहे.
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील जिल्हा परिषद (जि.प.) गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया २०२३ मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. आता या पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील परिक्षा केंद्राची निवड केलेल्या आरोग्य सेवक (पुरुष)४० टक्के, आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील परिक्षा १८ जुलै ते ३० जुलैपर्यंत होणार आहेत. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर परिक्षे संदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या सरळ सेवा भरतीची परिक्षा १८ जुलै रोजी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांची हाेणार आहे. १९ ते २३ जुलै रोजी आरोग्य परिचारिका, यानंतर २०ख् २२ व २३ जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के या पदाची परीक्षा हाेईल. तर १९ व २४ जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के या पदाची परीक्षा आहे. २५, २९ व ३० जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरील आयबीपीएस द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घेण्यास सुचवले आहे.