नियमांना बगल : पालघरचे बजेट मंजूर

By admin | Published: March 2, 2016 01:39 AM2016-03-02T01:39:09+5:302016-03-02T01:39:09+5:30

पालघर नगरपरिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या तसेच नगरपरिषदेच्या विशेष सभेसमोर अर्थसंकल्पाविषयी आवश्यक आकडेवारी सादर केलेली नसतानाही दोन्ही सभेने केवळ

Next to the rules: Palghar's budget approved | नियमांना बगल : पालघरचे बजेट मंजूर

नियमांना बगल : पालघरचे बजेट मंजूर

Next

हितेन नाईक,  पालघर
पालघर नगरपरिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या तसेच नगरपरिषदेच्या विशेष सभेसमोर अर्थसंकल्पाविषयी आवश्यक आकडेवारी सादर केलेली नसतानाही दोन्ही सभेने केवळ जमा व खर्चाच्या आकडेवारीच्या आधारे उपस्थित नगरसेवकांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देऊन आपल्या अज्ञानाचे व मिलीजुलीचे दर्शन घडविले. आश्चर्याची बाब म्हणजे काल (२९फेब्रुवारी रोजी) स. १० वा. स्थायी समिती समोर हा अर्थसंकल्प ठेवण्यात आल्यानंतर त्याला मान्यता मिळून अवघ्या दोन तासानंतर दुपारी १२ वा. विशेष सभेपुढे ठेवण्यात येऊन त्यास काही चर्चेनंतर मान्यता मिळाली.
पालघर नगरपरिषदेसमोर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात आगामी वर्षात १५ कोटी ४४ लाख ९७ हजार इतके उत्पन्न अपेक्षीत असून १५ कोटी ९० लाख २१ हजार ३५० इतका खर्च अपेक्षीत असल्याचे दर्शविले आहे. अर्थसंकल्पात नगरसेवकांना आरंभीच्या शिल्लकेसह वर्षाखेरीज किती रक्कम शिल्लक राहणार आहे. याची कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. विशेष सभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान स्वीकृत सदस्य अ‍ॅड जयंत राऊत यांनी या संबंधी विचारणा केली असता हा अर्थसंकल्प शिल्लकेचा अर्थसंकल्प आहे. मात्र किती शिल्लकेचा आहे. यासंबंधीची माहिती आपणास २-३ दिवसात उपलब्ध करून देतो असे उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली. अर्थात यानंतरही सभागृहामध्ये या संबंधीची कोणतीही प्रतिक्रीया उमटल्याची दिसून आले नाही. किंबहुना उपस्थित नगरसेवकांनी याच स्थितीत अर्थसंकल्पाला मान्यता दिली.
दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी काही पत्रकारांना आज या संबंधीची काही आकडेवारी उपलब्ध करून दिली असून हा अर्थसंकल्प ८३ लाख ९१ हजार ३५५ इतक्या शिल्लकेचा असल्याचे या माहितीवरून दिसून येते. मुख्याधिकाऱ्यांकडून आज उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आगामी वर्षात शिल्लक व जमा सह ३१ कोटी ६८ लाख ६७ हजार २०५ इतकी रक्कम जमा होईल तर आगामी वर्षात ३० कोटी ८४ लाख ९७ हजार ८५० इतका खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. आगामी वर्षात मालमत्ता करापोटी १० कोटी, पाणीपट्टी, ३.५ कोटी, विकास शुल्क २ कोटी, बाजार कर २५ लाख यासह पालीका सहाय्य अनुदान ४ कोटी, चौदावा वित्त आयोग २.२५ कोटी आदी महसुल अपेक्षीत धरण्यात आली असून विद्युत देयक ३ कोटी, स्वच्छता सफाई १.८० कोटी, कर्मचारीवेतन १.६० कोटी आदी प्रमुख खर्च अपेक्षीत करण्यात आला आहे. आगामी वर्षात रस्ते ३ कोटी, गटार २ कोटी, दलीत वस्ती कामे ३७ लाख आदी खर्च सुचविण्यात आला आहे.
नगरपरिषदेने पालिका हद्दीत सिग्नलयंत्रणा व सीसीटीव्ही उभारण्याचा संकल्प केलेला असून कार्यालयीन इमारत व सफाई कामगार निवासस्थानासाठी तरतूद करण्यात आली आहे. शहरात काही मार्गावर स्वच्छता गृह उभारण्याचाही संकल्पही या मध्ये अंतर्भूत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पाणेरी व टेंभोडे नाल्यामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती या दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Next to the rules: Palghar's budget approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.