पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 15, 2023 07:57 PM2023-10-15T19:57:45+5:302023-10-15T19:59:13+5:30

सोमण यांनी आगामी नऊ वर्षांतील घटस्थापनाच्या तारखा दिल्या आहेत.

next year Ghatasthapana On 3rd October, D.k. Soman says | पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती

पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती

ठाणे : यावर्षी रविवार १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२४ साली गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना असेल अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली. यावर्षी २४ ऑक्टोबर रोजी दसरा असून पुढील वर्षी हा सण १२ ऑक्टोबर रोजी असेल. 

पुढील १० वर्षातील घटस्थापनेचे दिवस पाहिले तर यामध्ये बुधवार सोडून सर्व वारी देवीचा उत्सव सुरू होत आहे. बुधवार येण्यासाठी सन २०३८ ची वाट पहावी लागेल. बुधवार २९ सप्टेंबर २०३८ रोजी घटस्थापना येणार आहे असेही सोमण म्हणाले. यावेळी सोमण यांनी आगामी नऊ वर्षांतील घटस्थापनाच्या तारखा दिल्या आहेत.

  • २०२५ - सोमवार २२ सप्टेंबर
  • २०२६ - रविवार ११ ऑक्टोबर
  • २०२७ - गुरूवार ३० सप्टेंबर
  • २०२८ - मंगळवार १९ सप्टेंबर
  • २०२९ - सोमवार ८ ऑक्टोबर
  • २०३० - शनिवार २८ सप्टेंबर
  • २०३१ - शुक्रवार १७ ऑक्टोबर
  • २०३२ - मंगळवार ५ ऑक्टोबर
  • २०३३ - शनिवार २४ सप्टेंबर

Web Title: next year Ghatasthapana On 3rd October, D.k. Soman says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.