ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातही लागू झाली रात्रीची संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 10:13 PM2021-04-05T22:13:00+5:302021-04-05T22:15:51+5:30

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कलम १४४ नुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीची संचारबंदीही लागू केली आहे.

Night curfew was also imposed in the area of Thane Police Commissionerate | ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातही लागू झाली रात्रीची संचारबंदी

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आदेश

Next
ठळक मुद्दे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आदेश ३० एप्रिलपर्यंत राहणार मनाई आदेश दिवसा जमावबंदीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कलम १४४ नुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश काढले आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीची संचारबंदीही लागू केली आहे.
पोलीस आयुक्तांनी काढलेल्या या मनाई आदेशानुसार ४ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सोमवारी ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान एकत्र येण्यास बंदी राहणार आहे. इतर वेळी सोमवारी ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत योग्य अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरण्यास बंदी राहणार आहे.
याशिवाय, सार्वजनिक किंवा खाजगी जागेत
कार्यक्र मांचे आयोजनाला बंदी आहे. अत्यावश्यक कामकाजासाठी वाहतुकीला परवानगी असुन सरकारी कार्यालयात ५० टक्के तर खाजगी कार्यालयांमध्ये सहकारी व खाजगी बँका, शेअर मार्केट, विद्युत वितरण कंपनी, दूरध्वनी सेवा व विमा कंपन्यांची कार्यालये वगळता इतर सर्व कार्यालय बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकान, बाजारपेठा, मॉल्स देखील बंद राहणार आहेत. खाजगी वाहतुकीस परवानगी असली तरी त्यावरही अनेक निर्बंध आहेत. रिक्षात दोन प्रवाशांना परवानगी असून टॅक्सी तसेच बस मध्ये फक्त ५० टक्के प्रवासी वाहून नेण्यास परवानगी आहे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे मध्ये जनरल डब्यात उभे राहून प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. सर्व उपहारगृह, बार, हॉटेलही बंद राहतील. मात्र त्यांना पार्सल आणि घरपोच सेवा देण्यास परवानगी मिळाली आहे. धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश असून फक्त पुजारी यांना मंदिरात परवानगी आहे. तसेच सलून, ब्युटी पार्लर देखील बंद राहतील, असे पोलिसांच्या मनाई आदेशात म्हटले आहे.

Web Title: Night curfew was also imposed in the area of Thane Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.