ठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ चाले; नऊ झाडे कोसळली, ५ वाहनांचे नुकसान

By अजित मांडके | Published: June 26, 2023 12:52 PM2023-06-26T12:52:34+5:302023-06-26T12:52:47+5:30

या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पाऊस अजून पाहीजेल तसा बरसलेला नाही. मात्र गेल्या ४८ तासात १४४.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Night game of rain in Thane; Nine trees fell, 5 vehicles damaged | ठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ चाले; नऊ झाडे कोसळली, ५ वाहनांचे नुकसान

ठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ चाले; नऊ झाडे कोसळली, ५ वाहनांचे नुकसान

googlenewsNext

ठाणे : शहरात पावसाचा चक्क रात्रीचा खेळ चालला आहे. चोवीस तासात ८५.४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच मध्यरात्री अवघ्या तीन तासात ५७.११ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. अशाप्रकारे रात्री पाऊस झोडपत असताना सोमवारी सकाळीपासून पावसाचे बरसणे सुरूच होते. याचदरम्यान शहरात ९ ठिकाणी झाडे कोसळली असून ७ ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पाडल्या असून या घटनांमध्ये ०५ वाहनांचे नुकसान झाले आहे. तर कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात सिलिंग पडली असून मुंब्र्यात विहीर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग खचल्याने त्यामध्ये दुचाकी पडली आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. 

या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पाऊस अजून पाहीजेल तसा बरसलेला नाही. मात्र गेल्या ४८ तासात १४४.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत असा चोवीस तासात ८५.४९ मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये मध्यरात्री अडीच ते साडेतीन या एका तासात ३८.८७ मिमी पाऊस झाला आहे. तर अडीच ते साडेचार या तीन तासात ५७.११ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. सोमवारी सकाळीही पावसाची रिमझिम सुरू असून मधूनमधून पावसाची मोठी सर येत जात असल्याचे दिसत होते. 

एकीकडे पाऊस आणि दुसरी आपत्ती व्यवस्थापन कक्षात साहेब येथे झाडे पडले आहे. किंवा झाडाची फांदी पडली आहे. तर कुठे आग लागली असून कुठे विहीर आणि तिच्या आजूबाजूचा भाग खचला आहे. अशा एकूण ३९ तक्रारींची नोंद त्या कक्षात झालेली आहे. त्यामध्ये ९ ठिकाणी झाडे पडली असून ७ ठिकाणी झाडांच्या फांड्या तुटून वाहनांवर किंवा घरावर तसेच सरंक्षण भिंतीवर पाडल्या आहेत. यामध्ये ०४ चारचाकी तर एका दुचाकी अशा ०५ वाहनांचे नुकसान झाले आहे. एका ठिकाणी आग लागली होती. सहा ठिकाणी झाडांची स्थिती धोकादायक असून एका ठिकाणी कंपाऊंड भिंत पडली आहे. तसेच १२ अन्य घटनांचा ही या तक्रारींमध्ये समावेश आहे.

खचलेल्या विहिरीत दुचाकी पडली
मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील जीवन बाग या ठिकाणी असलेली विहीर आणि तिच्या आजूबाजूचा परिसर खचल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून खचलेल्या विहिरीत दुचाकी पडली आहे. 

पालिकेच्या रुग्णालयामधील पीओपी सिलिंग पडली 
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील हृदयरोग विभागाच्या समोरील चालण्याच्या जागेमधील पीओपी (प्लास्टर) सिलिंग पडल्याची घटना रविवारी (२५ जून) रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सुमारे १०० मीटर लांब असलेल्या पीओपी सिलिंग पैकी २० मीटर पीओपी सिलिंग पडली असून उर्वरित सिलिंग धोकादायक झाल्याने ती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आलेली आहे. 

संरक्षण भिंत चाळीवर पडली
वर्तक नगर, लक्ष्मी-चिराग नगर या ठिकाणी आय थिंक लोढा (iTHINK LODHA)ची अंदाजे ३५ फुट लांब व अंदाजे ०८ फूट उंच संरक्षण भिंत तसेच त्या भिंती लगत असलेल्या खंडू मुठे चाळीतील गणेश बेंडकुळे यांच्या घराची भिंत ही पडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास समोर आली. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकापट्टी बांधण्यात आली असून घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Night game of rain in Thane; Nine trees fell, 5 vehicles damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.