चोरांना पकडण्यासाठी स्थानिकांची रात्रीची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:37 AM2018-10-02T04:37:50+5:302018-10-02T04:38:07+5:30

मानवी साखळी : चोऱ्या वाढल्याने मानपाड्यातील तरूणांनी घेतला पुढाकार

Night patrol of locals to catch thieves | चोरांना पकडण्यासाठी स्थानिकांची रात्रीची गस्त

चोरांना पकडण्यासाठी स्थानिकांची रात्रीची गस्त

Next

ठाणे : मागील आठवड्यात दोन दिवसांआड घोडबंदर भागातील मानपाडा, आझादनगर भागात घरफोडीच्या घटना घडल्याने आता स्थानिकांनीच मानवी साखळी तयार करून रात्रीची गस्त सुरू केली आहे. तसेच पोलिसांनीसुद्धा या भागात रात्रीची गस्त वाढवली आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती चोर सापडलेले नाहीत.

मागील आठवड्यात घोडबंदर भागातील मानपाडा भागात पहाटेच्या सुमारास चोरीच्या घटना घडल्या. येथील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी महापौरांच्या बहिणीच्या घरावरसुद्धा डल्ला मारला होता. दोन दिवसांनी पुन्हा याच भागात चोरीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये एका फेरीवाल्याचे दुकान फोडण्यात आले आहे, तर दुसºया घटनेतही घरातून ऐवज लंपास झाला. चोरांनी मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर, शिवाजीनगर या भागांंना टार्गेट केले आहे. त्यामुळे पोलिसांपुढे या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता या चोरांना पकडण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. ४० ते ५० स्थानिक तरुण मागील तीन ते चार दिवसांपासून या भागात रात्रीची गस्त घालत आहेत.
या तरुणांच्या हाती बॅटरी, स्टम्प किंवा काठी असते, जेणेकरून एखाद्याने हल्ला केला तर किमान त्याचा प्रतिक्रार करणे सोपे जाईल. या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ दोन ते तीन मुले थांबत असून एखादा अनोळखी इसम दिसल्यास त्याचा मोबाइल नंबर, घरचा पत्ता विचारला जात आहे. शिवाय, घरापर्यंत जात आहेत. काही छोट्या गल्ल्यांमध्ये विजेची व्यवस्था नसल्याने तेथील रहिवाशांना घराबाहेरील दिवे सुरू ठेवण्यास सांगितले जात आहे. तसेच घराचा दरवाजा व्यवस्थित बंद ठेवण्यास सांगितले जात आहे. पोलीससुद्धा या तरुणांच्या मदतीला गस्त देत आहेत.

मागील आठवड्यात चोरीच्या घटना वाढल्याने रात्रीची गस्त सुरू केली आहे. लोकांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे चोर सापडेपर्यंत ही गस्त सुरूच राहणार आहे.
- राजेंद्र शिंदे, उपविभागप्रमुख, शिवसेना, घोडबंदर
 

Web Title: Night patrol of locals to catch thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.