नीलिमा डावखरे अपघातग्रस्तांच्या मदतीला

By admin | Published: January 31, 2016 01:51 AM2016-01-31T01:51:14+5:302016-01-31T01:51:14+5:30

गुजरात राष्ट्रीय महामार्गावर विरारनजीक सहलीवरून परतणारी नॅशनल इंग्लिश स्कूल शाळेची बस महामार्गावर कलंडून अपघात झाला. याचदरम्यान, त्या मार्गाने येणाऱ्या आमदार निरंजन डावखरे

Nilima Left Front helps the victims | नीलिमा डावखरे अपघातग्रस्तांच्या मदतीला

नीलिमा डावखरे अपघातग्रस्तांच्या मदतीला

Next

ठाणे : गुजरात राष्ट्रीय महामार्गावर विरारनजीक सहलीवरून परतणारी नॅशनल इंग्लिश स्कूल शाळेची बस महामार्गावर कलंडून अपघात झाला. याचदरम्यान, त्या मार्गाने येणाऱ्या आमदार निरंजन डावखरे यांची पत्नी नीलिमा डावखरे या पालकत्वाच्या नात्याने मदतीसाठी धावून आल्या. स्थानिकांंसह वसईचे नगरसेवक रणजित वामन पाटील यांनी केलेल्या मदतीचे त्यांनी लोकमतशी बोलताना कौतुक केले.
नॅशनल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शुक्रवारी रिसॉर्टला सहलीसाठी गेले होते. तेथून परतताना त्यांची बस रस्त्याच्या दुभाजकावर कलंडली. याचदरम्यान, चालकाने पळ काढला, तर बसमधील जवळपास ४० हून अधिक मुले आणि शिक्षक अडकले होते. या अपघातग्रस्त ठिकाणी बघ्यांची गर्दी जमलेली, परंतु दुर्दैवाने मदतीसाठी कोणीही पुढे येण्याची हिंमत दाखवत नव्हते. याच वेळी नातेवाइकांकडून परत येणाऱ्या नीलिमा डावखरे यांना त्या ठिकाणी अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी चालकास तत्काळ गाडी थांबविण्यास सांगून त्या स्वत: अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचल्या. त्या वेळी घाबरलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना बसच्या पुढील काचेतून काढण्यात येत होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तडक रु ग्णवाहिका बोलवून विद्यार्थ्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये नेण्याबरोबर त्यांच्यावर ताबडतोब उपचार करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप परत जाण्याची व्यवस्था केली. सर्व जण आपापल्या घरी सुखरूप पोहोचल्याची माहिती घेऊन मगच त्या घटनास्थळाहून मार्गस्थ झाल्या. याबाबत, आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांच्या फेसबुकवर ही माहिती फोटोसह अपलोड केली.

कर्तव्य म्हणून धाव घेतलीच, पण राजकीय हेतूपेक्षा एक पालक म्हणून आपली जबाबदारी या वेळी महत्त्वाची दिसून आली.’’
- नीलिमा निरंजन डावखरे

Web Title: Nilima Left Front helps the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.