दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नीलपुष्पचा नीलमणी पुरस्कार प्रदान,  स्त्रियांच्या पारंपारिक गाण्यांचे काव्याचे स्पर्धात्मक सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:20 PM2018-08-07T16:20:00+5:302018-08-07T16:36:14+5:30

ठाण्यातील  नीलपुष्प साहित्य मंडळाचा ऑगस्ट महिन्यातील विशेष काव्यसोहळा पार पडला. 

Nilpushap Neelmani Award for Director, Kumar Sohoni, Competitive Presentation of Women's Traditional Songs | दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नीलपुष्पचा नीलमणी पुरस्कार प्रदान,  स्त्रियांच्या पारंपारिक गाण्यांचे काव्याचे स्पर्धात्मक सादरीकरण

दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नीलपुष्पचा नीलमणी पुरस्कार प्रदान,  स्त्रियांच्या पारंपारिक गाण्यांचे काव्याचे स्पर्धात्मक सादरीकरण

Next
ठळक मुद्देदिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नीलपुष्पचा नीलमणी पुरस्कार प्रदानस्त्रियांच्या पारंपारिक गाण्यांचे काव्याचे स्पर्धात्मक सादरीकरण मी एक ठाण्यातला छोटा कलाकार आहे : दिग्दर्शक कुमार सोहोनी

ठाणे : नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ऑगस्ट महिन्यातील विशेष काव्यसोहळ्यात संगीतकार, गायक, अभिनेते, दिग्दर्शक या विविधांगी भुमिकेतून सिने - नाट्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे कुमार सोहोनी यांना नीलपुष्प साहित्य मंडळाचा मानाचा समजला जाणारा, 'नीलमणी पुरस्कार' शाल, श्रीफळ, मानचिन्ह पुष्पगुछ स्वरुत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देताना नीलपुष्पचे अध्यक्ष ठाणेभूषण  डॉ. नारायण तांबे यांनी कुमार सोहोनी आणि आपल्या भेटीचा प्रसंग कथन केला. या कथनातून दोघांचाही संवेदनशील स्वभाव कळून आला.
तांबे म्हणाले कुमारजी हे असं व्यक्तीमत्व आहे की, सिने- नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय, असे कार्य करुन सुध्दा "आपण काहीच नाही" हा स्वभाव त्यांनी बाळगला म्हणून ते मला आगळेवेगळे कलाकार वाटतात. हा त्यांचा नम्रपणा वखडण्याजोगा आहे. म्हणून हा 'नीलमणी पुरस्कार' त्यांना देताना मला आनंद होत आहे. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना. कुमार सोहोनी म्हणाले, मी एक ठाण्यातला छोटा कलाकार आहे, माणूस आहे. परंतु समोर बसलेले आपण सर्व वयाने, मानाने जेष्ठ व श्रेष्ठ आहात. त्यामुळे तुमच्याकडून हा मला आशीर्वादच मिळला आहे, असे मी मानतो. तसेच तुम्ही सर्वजन साहित्य क्षेत्रातले आहात आणि माझे काम तुमच्यासारख्या कवी, लेखकांचे लेखान श्रोत्यांपर्यंत पोहोचविणेे इतकेच असते. पण तरीही मला कविता, लेख, कथा आणि नाटक लिहीता येत नाही. तांबे साहेब गेली २५ वर्ष  साहित्य निर्माणाचे तथा सामाजिक जागृतीचे काम करत आहेत. हे कौतुक करण्यासरखे आहे. या शब्दात कुमार सोहोनी यांनी तांबे यांच्या नीलपुष्प कार्याची प्रशंसा केली.

या सोहळ्यात नीलपुष्पच्या उपाध्यक्षा जेष्ठ साहित्यिका सुधा मोकाशी यांच्या 'मिळून सार्‍या गाऊ...' या पुस्तकावर आधारित स्त्रियांच्या पारंपारिक गाण्यांचे काव्याचे  स्पर्धात्मक सादरीकरण झाले. पारंपारिक गाण्यांना अधुनिकतेचा साज चढवत, सुधाताईंनी ही गाणी लिहिली. आज २० वर्षानंतर या पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. याच गाण्यांवर स्त्रियांनी ठेका धरत सुरेल गीते गायली. विशेष म्हणजे पुरूष काव्यकलारांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेच्या पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावरही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यामुळे सुधाताई यांना फार आनंद झाला. हा नीलपुष्पचा स्त्री सन्मान दिनच वाटत होता. यात मोहसिना पठाण या मुस्लीम भगीनीला उत्तेजनार्थ दुसरे पारितोषीक मिळाले. उत्तेजनार्थ पहिले  पारितोषीक ज्येष्ठ साहित्यिक कवी शरद भालेरावांना मिळले. स्पर्धेचा तृतीय क्रमांक कवयित्री त्रिवेणी खांडे तर द्वितीय क्रमांक कवी राजेश साबळे यांना देण्यात आला. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक शाहीर किरण सोनावणे यांना दिला गेला. अशा रितीने परितोषीके विजेत्यांना देण्यात आली. या स्पर्धकांमध्ये खालीलप्रमाणे कवी , कवयित्रींचा समावेश होता. सुहासिनी भालेराव, सिमा प्रधान, कीर्ती खांडे, आशा राजदेरकर,  जया राव, बापूसाहेब भालेराव, मनमोहन रोगे, अरविंद विंजुरे, शुभाष जैन, अमृता चौवान, प्रियांका जाधव, मिना कुलकर्णी, नंदा कोकाटे, रमाकांत प्रधान ए. के. देशपांडे, या २२ जनांचा समावेश होता. स्पर्धेचे परिक्षण वैदेही केवटे आणि ज्योती गोसावी यांनी केले. डॉ. नारायण तांबे यांनी स्वत:च्या 'मी एक' या आपल्या चरित्र ग्रंथातील 'आधी लगीन कोंडाण्याचं नंतर रायबाचं' ह्या प्रसंगाचे अभिवाचन केले. साईबाबांच्या या कथेने सर्व सदस्य भारावून गेले.

यावेळी भारतीय स्वातंत्र्यावर वीरगीते, स्फुर्तीदायी गीते झाली. यात इतरही विषांयांचा समावेश होता. 'ये मेरे वतन के लोगो',  'हा माझा भारत देश', 'भारत हमको जानसे प्यारा है'. अशी अनेक लोकप्रिय गाणी तसेच स्वरचित काव्याचे सादरीकरण झाले. त्यात डॉ शरद घाटे, रविंद्र कारेकर, राजरत्न राजगुरु, विश्वास पटवर्धन, अँड. रुपेश पवार, रमाकांत प्रधान, सुरेश कुभारे, सुभाष सारदळ, नरेश पाटील, अनुपमा पाटील, नाजीरा पठाण, रशीद पठाण, अदीत्य संभुस, प्रमोद घाडगे, लक्ष्मण माळी, प्रियांका जाधव, प्रविण फणसे हे सर्व कवी, कवयित्री सहभागी होते.

Web Title: Nilpushap Neelmani Award for Director, Kumar Sohoni, Competitive Presentation of Women's Traditional Songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.