मतदानासाठी नऊ हजार पोलिसांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:44 PM2019-10-14T23:44:15+5:302019-10-14T23:44:31+5:30

मतदारसंघनिहाय एक अर्धसैनिक बल तुकडी : १२०० होमगार्ड बाहेरून येणार

Nine thousand police guard for voting | मतदानासाठी नऊ हजार पोलिसांचा पहारा

मतदानासाठी नऊ हजार पोलिसांचा पहारा

Next

ठाणे : विधानसभेच्या मतदानासाठी ठाणे शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. यासाठी सुमारे नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहर आयुक्तालयातील पाच परिमंडळांत १३ मतदारसंघ येत असून प्रत्येक मतदारसंघाच्या ठिकाणी अर्धसैनिक बलाची तुकडी तैनात राहणार आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत ठाणे शहर पोलीस दलातील एक हजार पोलीस कर्मचारी इतरत्रही बंदोबस्तासाठी पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत २१३ उमेदवार रिंगणात आहेत. या १८ पैकी १३ मतदारसंघ ठाणे शहर पोलीस दलातील पाच परिमंडळांतर्गत येत आहेत. या १३ मतदारसंघांत ९१३ केंदे्र असून त्याअंतर्गत चार हजार १६५ बुथ आहेत. या परिमंडळात मतदान शांततेत पार पडण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसलेली आहे. या मतदानाच्या दिवशी शहर पोलीस दलातील पोलीस आयुक्त, सहआयुक्तांसह चार अतिरिक्त आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांसह बाहेरून येणाºया पोलीस अधिकारी तसेच १२०० होमगार्ड यांच्या १३ अर्धसैन्य दलाच्या तुकड्या असा एकूण आठ हजार ८०० जणांचा बंदोबस्त राहणार आहे.


प्रत्येक मतदारसंघात एक तुकडी
शहर पोलीस आयुक्तालयात असलेल्या १३ मतदारसंघांत प्रत्येकी १०० अर्धसैनिक बलाची एक असलेली तुकडी तैनात राहणार आहे. ती त्या मतदारसंघात गस्तीबरोबर काही पॉइंटवर स्थितही राहणार आहे.


३८ वरिष्ठ अधिकारी बाहेरून येणार
बाराशे होमगार्ड यांच्यासह दोन पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक आणि १८ सहायक पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपनिरीक्षक शहर आयुक्तालयात बाहेरून बंदोबस्ताला येणार आहेत.


होमगार्ड अर्धेच मिळाले
१३ मतदारसंघांसाठी दोन हजार ४०० होमगार्ड मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यापैकी एक हजार २०० इतकेच होमगार्ड शहर पोलीस दलाला मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचे अर्धेच बळ मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


संवेदनशील केंद्र नाही
शहर पोलीस दलातील १३ मतदारसंघांत पोलिसांच्या दृष्टिक्षेपातून एकही संवेदनशील केंद्र नाही. तसेच एका बुथवर एक कर्मचारी असा दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


एक हजार पोलीस जाणार इतर ठिकाणी
शहरात अर्धसैनिक बलाच्या तुकडीसह होमगार्ड येणार आहेत. त्यातच, ठाणे पोलीस यासह इतर शाखांचे पोलीस यावेळी बंदोबस्तासह तैनात राहणार असून उर्वरित राहणारे इतर एक हजार पोलीस इतर मतदारसंघांत बंदोबस्तासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Nine thousand police guard for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.