पदवीधर मतदारसंघात वाढले नऊ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:12 AM2018-06-03T02:12:37+5:302018-06-03T02:12:37+5:30

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारनोंदणीची नुकतीच संधी देण्यात आली होती. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदार संघात नव्याने नऊ हजार पदवीधर मतदारांनी नावनोंदणी केली आहे.

 Nine thousand voters increased in the Graduate Constituency | पदवीधर मतदारसंघात वाढले नऊ हजार मतदार

पदवीधर मतदारसंघात वाढले नऊ हजार मतदार

Next

ठाणे : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारनोंदणीची नुकतीच संधी देण्यात आली होती. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदार संघात नव्याने नऊ हजार पदवीधर मतदारांनी नावनोंदणी केली आहे. याशिवाय, आधीचे ३७ हजार मतदार आहेत. यानुसार, आता सुमारे ४६ हजार पदवीधर मतदार जिल्हाभरात झाल्याचे निवडणूक उपजिल्हाप्रमुख फरोग मुकादम यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी २ जुलैपर्यंत २४ तास या तत्त्वावर जिल्हास्तरीय तक्रार निरीक्षण कक्ष व नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.
या निवडणुकीसंदर्भात काही तक्रार दाखल करावयाची असल्यास संबंधितांनी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर अथवा संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केले.
कोकण विभाग : नितीन नाईक विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक -०२२ - २७५७१५१६, ८६९१०१८००१, ॅु‘ङ्मल्ल‘ंल्ल@ॅें्र’.ूङ्मे
ठाणे विभाग : रोहिदास चौधरी, निवडणूक नायब तहसीलदार ०२२- २५४५४१४२ , ९८९२२६९१७२ ८िीिङ्म३ँंल्ली@ॅें्र’.ूङ्मे या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

जिल्ह्यात २० हजार दुबार, तर साडेसात हजार मृत मतदार
ठाणे जिल्ह्यात मतदारयाद्यांचे पुनरिक्षण केले जात आहे. यात शनिवारपर्यंत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दोन लाख ८५ हजार २३३ घरांना भेटी दिल्या. यामध्ये १३ हजार नवीन पात्र मतदारांची नोंद झाली. सुमारे २० हजार मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचे आढळून आले. याशिवाय, सात हजार ५०० मतदार मयत झाले आहेत. तसेच ३४ हजार मतदारांचे कायमस्वरूपी अन्य पत्त्यांवर स्थलांतर झाल्याचे या मोहिमेत आढळले आहे.

१५ दिवसांपासून मतदारयाद्यांचे पुनरिक्षण केले जात आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. याकामी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. जास्तीतजास्त पात्र मतदारांची नोंदणी आणि मतदारांची पडताळणी करण्याचे काम २० जूनपर्यंत चालणार आहे.

केंद्रस्तरीय अधिकारी ज्या पात्र मतदारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांची नावे नोंदणी करणे, १ जानेवारी २०१९ रोजी पात्र ठरणाºया भावी मतदारांची नावे गोळा करणे, दुबार, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची माहिती गोळा करणे तसेच मतदारयादीतील नोंदणीची दुरु स्ती करणे आदींबाबत मार्गदर्शन करून नोंदणीबाबत माहिती देत आहेत.

ज्या मतदारांचे छायाचित्र मतदारयादीत नाही. तसेच कृष्णधवल छायाचित्र आहे. त्यांचे नजीकचे रंगीत छायाचित्र फॉर्म नं. ८ भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांकडे जमा करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी
डॉ. कल्याणकर यांनी केले आहे.

Web Title:  Nine thousand voters increased in the Graduate Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.