नितीन गडकरी यांनी चव्हाणांना केले लक्ष्य?, फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:31 AM2018-03-13T02:31:41+5:302018-03-13T02:31:41+5:30

एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Nitin Gadkari's goal of Chavan, the result of his friendship with Fadnavis | नितीन गडकरी यांनी चव्हाणांना केले लक्ष्य?, फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचा परिणाम

नितीन गडकरी यांनी चव्हाणांना केले लक्ष्य?, फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचा परिणाम

Next

- अनिकेत घमंडी 
डोंबिवली : एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
यापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून चव्हाण हे गडकरी गटाचे, असे ओळखले जात होते. मात्र आता दुसºयांदा आमदार झाल्यानंतर व राज्यमंत्री म्हणून चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक खूप वाढली.
मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवले. त्यामुळे गडकरी यांचे लक्ष्य डोंबिवली अथवा डोंबिवलीकर नसून चव्हाण असल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री चव्हाण यांना आमदारकीचे तिकिट मिळवून देण्यात गडकरी यांचा मोठा वाटा आहे.
तत्कालीन आमदार-महापौर हरिश्चंद्र पाटील यांना आमदारकीचे तिकीट डावलून चव्हाण यांना २००९ मध्ये देण्यात आले. पाटील हे मुंडे गटाचे समर्थक होते. मुंडे गटाला शह देत गडकरी गटाने चव्हाण यांना उमेदवारी दिली होती.
चव्हाण यांचे नेतृत्वगुण हेरुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी, त्यांना ठाणे, उल्हासनगर, भार्इंदर, पनवेल आदी ठिकाणी निवडणूक प्रभारी म्हणून, तसेच कोकणातील ग्रामपंचायत, नगरपरिषदांसह अन्य संपर्काची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यामुळे चव्हाण यांची ओळख अलीकडच्या काळात फडणवीस यांचे विश्वासू मंत्री, अशी झाली. डोंबिवलीतील गडकरी, तावडे यांच्या फेºया कमी झाल्या. नेमकी तीच सल गडकरींच्या मनात असल्याचे भाजपातील काहींचे म्हणणे आहे.
>‘श्रेष्ठींच्या विधानावर मत देणे तत्त्वात नाही’
गडकरी यांची डोंबिवलीवरील टीका, त्यावरुन उठलेले काहूर आणि त्याचे भाजपांतर्गत राजकारणाचे पदर याबाबत राज्यमंत्री चव्हाण यांना विचारले असता पक्षश्रेष्ठींच्या विधानावर मत देणे पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कामातून बोलणे सर्वाधिक योग्य राहील असे सूचक विधान त्यांनी केले.

Web Title: Nitin Gadkari's goal of Chavan, the result of his friendship with Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.