राज्य उत्पादन शुल्कच्या ठाण्याच्या अधीक्षकपदी अखेर नितीन घुले

By जितेंद्र कालेकर | Published: June 1, 2018 09:43 PM2018-06-01T21:43:44+5:302018-06-01T21:43:44+5:30

गेली चार महिने अधीक्षकाच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आता नितीन घुले यांच्या रुपाने पूर्णवेळ अधीक्षक मिळाला आहे. तर पुण्याच्या अधीक्षकपदी गडचिरोलीचे डॉ. बी. एच. तडवी यांची बदली राज्य शासनाने केली आहे.

Nitin Ghule finally became the state's excise superintendant Thane | राज्य उत्पादन शुल्कच्या ठाण्याच्या अधीक्षकपदी अखेर नितीन घुले

गेली चार महिने रिक्त होते ठाण्याचे अधीक्षकपद

googlenewsNext
ठळक मुद्देगेली चार महिने रिक्त होते ठाण्याचे अधीक्षकपदपुण्यात गडचिरोलीचे डॉ. तडवीमुंबई शहरच्या चासकर यांची उस्मानाबादला बदली

लोकमत इफेक्ट
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेली चार महिने रिक्त असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाण्याच्या अधीक्षकपदी अखेर नंदुरबारचे नितीन घुले यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.
राज्य शासनाला एकट्या ठाणे जिल्हयातून वर्षभरातून सुमारे १०० कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळे याठिकाणी येण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाची नियुक्ती करतात, याकडेच राज्यभरातील या विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात १२ मार्च २०१८ रोजी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्तही प्रसिद्ध केले होते.
ठाण्याचे तत्कालीन अधीक्षक एन. एन. पाटील हे जानेवारी २०१८ मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर १ फेब्रुवारीपासून ठाण्याच्या अधीक्षकपदी कोणाचीच नियुक्ती न झाल्याने पालघरचे तत्कालीन अधीक्षक विठ्ठल लेंगरे यांच्याकडे पालघरसह ठाण्याचाही अतिरिक्त पदभार सोपविला होता. लेंगरे हे देखील ३१ मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर आता नंदुरबारच्या घुले यांची ठाण्याच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई शहर चे ए. बी. चासकर यांना उस्मानाबादला पाठविण्यात आले आहे. तर गेली तीन वर्ष गडचिरोलीत चांगली कामगिरी बजावणारे डॉ. बी. एच. तडवी यांची पुण्याच्या अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. गृहविभागाचे कार्यासन अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी काढलेल्या या आदेशातच बदलीमध्ये फेरफार करता येणार नसल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी घुले यांनी उपअधीक्षक युवराज राठोड यांच्याकडून ठाण्याची सूत्रे स्वीकारली. तर पालघरचा अतिरिक्त कारभार मुंबईच्या उपअधीक्षक स्रेहा सराफ यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Nitin Ghule finally became the state's excise superintendant Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.