निजामपूर पोलीस ठाणे दंगलीतील मुख्य आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:25 AM2018-07-16T06:25:03+5:302018-07-16T06:25:12+5:30

शहरातील कोटरगेट मशिदीसमोरील नियोजित निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवून आणणाऱ्यांमधील मुख्य आरोपी युसूफ रजा यास मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली आहे.

 Nizampur police station's main suspect arrested in riots | निजामपूर पोलीस ठाणे दंगलीतील मुख्य आरोपीस अटक

निजामपूर पोलीस ठाणे दंगलीतील मुख्य आरोपीस अटक

Next

भिवंडी : शहरातील कोटरगेट मशिदीसमोरील नियोजित निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवून आणणाऱ्यांमधील मुख्य आरोपी युसूफ रजा यास मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली आहे.
निजामपूर पोलीस ठाण्याची इमारत दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने तत्कालीन सरकारने शहरातील कोटरगेटसमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, तेथे २००६ मध्ये बांधकाम सुरू झाले होते. मात्र, काही दिवसांनी तेथील नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध केला. पोलीस ठाण्याऐवजी तेथे दुसरा प्रकल्प राबवण्यासाठी नागरिकांनी सरकारकडे अर्ज केले होते. हा विरोध ५ जुलै २००६ ला उफाळून आला. नागरिकांनी पोलीस ठाण्याचे बांधकाम बंद पाडले. तत्कालीन पोलीस उपायुक्त आर.डी. शिंदे तेथे पोलीस फौजफाटा घेऊन गेले असता, रजा अ‍ॅकॅडमी संघटनेचा प्रमुख युसूफ रजा व शकील रजा यांनी नागरिकांना भडकावून पोलिसांवर दगडफेक करून दंगल घडवली. त्यावेळी शिंदे यांच्यासह ३९ पोलीस जखमी झाले होते. दोन पोलिसांना बागेफिरदोस येथे ठार मारले होते. याप्रकरणी युसूफ रजासह ४०० नागरिकांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या घटनेनंतर शकील रजा फरार झाला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी देशातील विमानतळ प्राधिकरणास त्याची माहिती दिली होती. युसूफ रजा हा रविवारी सकाळी सौदी अरेबिया येथून मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, मुंबईतील सहार विमानतळावर त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर, त्याला निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला दुपारी भिवंडी न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी तळोजा कारागृहात केल्याची माहिती निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष घाटेकर यांनी दिली.

Web Title:  Nizampur police station's main suspect arrested in riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग