उल्हासनगरातील आरोग्य सुविधा तोकडी, राज्य शासनाच्या मदतीची गरज: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 04:23 PM2020-07-05T16:23:15+5:302020-07-05T16:25:09+5:30
उल्हासनगरातील आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेता येणार असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्याचे चित्र होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींनी कॅम्प नं -४ येथील कोरोना रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधेचा आढावा घेतला.
उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येची घनता, तोगडी आरोग्य सुविधा बघता राज्य शासनाने महापालिकेला मदत करणे गरजेचे असल्याचे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरातील आरोग्य सुविधाचा पाहणी दौरा वेळी व्यक्त केले. रुग्णालयाच्या पाहणी नंतर फडणवीस यांनी आयुक्तां सोबत चर्चा करून आरोग्य सुविधेचा आढावा घेवून स्वाब अहवाल २४ तासात आलाच पाहिजे. अशी सूचना केली आहे.
उल्हासनगरातील आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेता येणार असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्याचे चित्र होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींनी कॅम्प नं -४ येथील कोरोना रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. त्यांनी शहरात किती रुग्ण संख्या आहेत, उपाययोजना, रुग्णालयाची संख्या आधीची माहिती डॉक्टरांकडून घेतली. शहरातील लोकसंख्येची घनता, तोगडी आरोग्य सुविधा बघता राज्य शासनाने त्वरित मदत करण्याची प्रतिक्रिया दिली. तसेच संशयित रुग्णांच्या स्वाब अहवालाला उशीर होत असल्याने रुग्णांवरिल उपचारास उशीर होतो. या दरम्यान रुग्णाची तब्येत गंभीर होत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचा स्वाब अहवाल २४ तासात येणे गरजेचे आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
कोविड रुग्णालयाच्या पाहणी नंतर फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी आरोग्य सुविध्येचा आढावा घेऊन रुग्णालयाची संख्या, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संख्या वाढविण्याची सूचना केली. व्हेन्टेलेटर वाढविण्यासाठी सांगितले. एकूणच आरोग्य सुविधेची चिरफाड फडणवीस यांनी करून अप्रत्यक्ष धोक्याचा इशारा दिला आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढ होत असून रुग्णाची रुग्णांची संख्या २५०० पेक्षा जास्त झाली. रुग्ण वाढीचा असाच वाढीचा दर राहील्यास आरोग्य सुविधा कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेचे स्वतःचे एकही रुग्णालय नसून खाजगी व राज्य शासनाच्या रुग्णालयावर शहराची आरोग्य सुविधा अवलंबून आहे.
महापालिका पर्यायी रुग्णालयालाच्या शोधात
शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून शहर पूर्वेतील कोविड रुग्णालयासह विमा रुग्णालय, अभ्यासिका, आयटीआय शाळा व वेदांत कोरोना रुग्णालय हे रुग्णांनी फुल झाले. नवीन रुग्णावर कुठे उपचार करावे? असा प्रश्न महापालिका आरोग्य विभागा समोर उभा ठाकला आहे. असाच प्रकार सुरू राहील्यास आरोग्य सुविधावर प्रश्नचिन्ह उभे ठाकणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली
पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित
कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे
मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख
OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV
बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार