डॉक्टर नाही, मग भगत द्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवीचे रवाळ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 03:27 PM2022-06-06T15:27:38+5:302022-06-06T15:30:01+5:30

आदिवासी कष्टकरी माणूस हाय, माणूस हाय, डॉक्टर नको भागत द्या या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता.

No doctor, then give Bhagat; Workers' agitation in front of the Collector's office in thane | डॉक्टर नाही, मग भगत द्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवीचे रवाळ आंदोलन

डॉक्टर नाही, मग भगत द्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवीचे रवाळ आंदोलन

Next

ठाणे : ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे, आरोग्य संस्था मरणपंथाला आल्या आहेत. याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपचारासाठी डॉक्टर देण्यात शासन कुचकामी ठरल्याने श्रमजीवी संघटनेने संतप्त होऊन चक्क ग्रामीण भागातील पारंपरिक भगत यांचा पारंपरिक नवीन भगत तयार करण्याचा रवाळकार्यक्रमाचे आयोजन केले यात सुमारे 20 भगतांचा पदवीदान कार्यक्रम करत यांना आरोग्य सेवेत शासनाने नियुक्त करावे अशी मागणी करत शासनाचे लक्ष वेधले. तर, आदिवासी कष्टकरी माणूस हाय, माणूस हाय, डॉक्टर नको भागत द्या या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता.

ठाणे, पालघर, नाशिकच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालय संस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोवीस मे रोजी एकाच वेळी एकाच दिवशी ठाणे पालघर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा पंचनामा केला. तेथील  विदारक वास्तवाचा संघटनेने पार पोस्टमार्टेमच केले आहे. या पाहणी दौऱ्यातील माहितीचे विश्लेषण करून एक अहवाल श्रमजीवी संघटनेने प्रकाशित केला. गरीब सामान्य माणूस उपचारावाचून तडफडत आहे, खाजगी संस्था उपचार तर देतात मात्र महागडी बिलं अनेकांना कर्जबाजारी बनवत आहेत.

हजारो कुपोषणग्रस्त बालकं, गर्भवती माता,नवजात अर्भक मृततुशय्येवर जात आहेत. मात्र यावर कोणीही बोलायला तयार नाही. या उलट देशात-राज्यात मंदिर,मज्जिद,भोंगा,  दौरे, जात, धर्म ,पंथाचे वाद यावरच राजकारण सुरू आहे.  सत्ताधारी किंवा  विरोधक कोणीही गरीब सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत.  याबाबत श्रमजीवी संघटनेने व्यक्त केला आहे आणि आणि आरोग्य ही जीवनावश्यक सेवा प्रत्येक गरीब सामान्य रुग्णाला हक्काने मिळायलाच हवी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांना दर्जेदार मोफत उपचार मिळायलाच हवा यासाठी आता श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

श्रमजीवी संघटना संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली  24 मे रोजी दिवसा तर 31 मे रोजी मध्यरात्री संघटनेने वेगवेगळ्या टीम बनवून केलेल्या पंचनामा यातून समोर आलेल्या माहितीत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत, तब्बल एक हजारपेक्षा जास्त कार्यकते या कामासाठी फिरत होते. माहितीचे एकत्रीकरण करून प्रकाशित केलेला हा 'पोस्टमार्टेम' अहवाल म्हणजे आरोग्य संस्थेच्या मरणासन्न अवस्थेचा पोस्टमार्टेम रिपोर्टच म्हणावा लागेल.

दरम्यान, आरोग्य सेवेच्या या प्रश्नावर सोमवार ६ जून रोजी श्रमजीवी संघटनेने मोठे आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यात मरण पावलेल्या या आरोग्य व्यवस्थेवर उपचार म्हणून गावागावात भगत, मांत्रिक यांना आरोग्य केंद्राचे प्रमुख घोषित करावे अशी उपरोधिक मागणी करत "भगतांचा पदवीदान सोहळा" म्हणजेच पारंपरिक 'रवाळ' (अंगात देव घेऊन जागर करण्याचा कार्यक्रम) ठाण्यात लक्षवेधी ठरले. रोज मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्या निष्पाप रुग्णांना,बालकांना, गर्भवती मातांना झालेल्या मरणयातना आता थांबायला हव्यात यासाठी श्रमजीवी आक्रमक भूमिकेत दिसली.

ठाणे-पालघर-नाशकात ६१ % मनुष्यबळ 

ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्यक्ष पंचनामा केलेल्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदांमध्ये आरोग्य सहाय्यक ५३ मंजूर पदांपैकी केवळ ३२ पदं भरलेली असून २१ पदं रिक्त आहेत आरोग्य सहाय्यिका ६५ मंजूर पदांपैकी ५२ पदं भरलेली असून १३ रिक्त आहेत . आरोग्य सेवकाची २४१ पदं मंजूर असून १५४ पदं भरलेली तर तब्बल ८७ पदं रिक्त आहेत तर आरोग्य सेविकेची मंजूर २९५ पदांपैकी २१० पदं भरलेली असून ८३ पदं रिक्त आहेत . जीएनएम च्या ४२ मंजूर पदांपैकी ३ ९ पदं भरलेली असून ३ पदं रिक्त आहेत. औषध निर्माता ४ ९ मंजूर पदांपैकी ३८ कार्यरत असून ११ पदं रिक्त आहेत . प्रयोग शाळा तंत्रज्ञ मंजूर ५ ९ पदांपैकी ४६ पदं भरलेली असून १३ पदं रिक्त आहेत. करण्यात आलेल्या सर्वेक्षणातीलब ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहयाक आणि कर्मचार्याच्या ११६८ मंजूर पदांपैकी ७१३ पदं भरलेली असून ४५५ पदं रिक्त आहेत. अर्थात ३ ९ % पदं हि रिक्त असून ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: No doctor, then give Bhagat; Workers' agitation in front of the Collector's office in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे