उल्हासनगर महापालिकेत मास्क शिवाय प्रवेश नाही, वॉर्डबॉयच्या नोकरीवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 06:45 PM2022-06-09T18:45:35+5:302022-06-09T18:46:02+5:30
कोरोना काळात महापालिकेने कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय यांची भरती केली होती.
सदानंद नाईक
उल्हासनगर : राज्यासह शहरात कोरोनाच्या रुग्णात वाढ झाल्याने, मास्क शिवाय महापालिकेत प्रवेश नाही. अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून नागरिकांनी मास्क घालण्याचे आवाहनही केले.
उल्हासनगर गेले काही महिने कोरोना मुक्त झाले होते. मात्र राज्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेने मास्क शिवाय प्रवेश नाही. असा निर्णय महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी घेतला. नागरिकाना विना मास्क महापालिकेत प्रवेश नाकारला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, लॉकडाऊन मध्ये शिथीलता येऊन सर्व निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संकेत वाढ झाल्याने, राज्य सरकार सतर्क झाले. महापालिका प्रवेशासाठी मास्कची सक्ती केली असून नागरिकांनी स्वतःसह कुटुंबासाठी मास्क वापरण्याचे आवाहन आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी केले. शहरात १७ रुग्ण पॉझिटिव्ह असुन त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. तसेच नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट सुरु केल्या आहेत. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोना काळात महापालिकेने कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय यांची भरती केली होती. त्यांनी स्वतःसह कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून कोविड रुग्णालय, लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली. मात्र वॉर्डबॉय यांना कामावरून कमी करून ठेकेदारांद्वारे घेणार असल्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापालिकेच्या या निर्णयामुळे बेकार झालेल्या वॉर्डबॉयवर उपासमारीची वेळ आली. गरज सरो, वैध मरो, या म्हणीचा प्रत्यय आल्याचे वॉर्डबॉय यांना आला. दरम्यान गेल्या एका महिन्यांपूर्वी महापालिकेने कामावरून कमी केलेल्या वॉर्डबॉय यांना कोरोना रुग्ण वाढत असल्याने, त्यांना मुदतवाढ न देता, ठेकेदारांद्वारे कामावर घेतले जाणार आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी दिली आहे.