दीपावलीसाठी मुख्य बाजारपेठेत वाहनांना नो एण्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:49 PM2018-10-30T23:49:40+5:302018-10-30T23:49:57+5:30
ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक विभागाने गुरुवारी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दुचाकी सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना मुख्य बाजारपेठेत नो एण्ट्री केली आहे.
ठाणे : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक विभागाने गुरुवारी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दुचाकी सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना मुख्य बाजारपेठेत नो एण्ट्री केली आहे. याचदरम्यान ती सिद्धिविनायक मंदिर येथून वळण घेऊन आनंद दिघे टॉवर यामार्गे ठाणे स्टेशनला जातील.
ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत बऱ्याच प्रकारे कपड्यांसह सोन्याच्या दागिन्यांची दुकाने आहेत. त्यामुळे येथे सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू असते. त्यातच,येत्या ६ नोव्हेंबर रोजी दीपावली असल्याने नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दीही वाढू लागली आहे.
ती येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शहर वाहतूक विभागाने ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतून सुरू असलेली वाहतूक येत्या १ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दुचाकी वाहने सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश न देता ती कोर्टनाका येथून आनंद दिघे टॉवर चिंतामणी चौक येथून ठाणे स्टेशन या पर्यायी मार्गाने पुढे स्टेशन येथे जातील, अशी पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.