दहीहंडी उत्सवाच्या दिवशी ध्वनी प्रदूषणात वाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:00+5:302021-09-02T05:27:00+5:30

ठाणे : दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या दिवशी होणारे ध्वनिप्रदूषणच्या तुलनेत मंगळवारी या उत्सवाच्या दिवशी ध्वनीप्रदूषण आढळून आले नाही. उलट २० ...

No increase in noise pollution on the day of Dahihandi festival | दहीहंडी उत्सवाच्या दिवशी ध्वनी प्रदूषणात वाढ नाही

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी ध्वनी प्रदूषणात वाढ नाही

Next

ठाणे : दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या दिवशी होणारे ध्वनिप्रदूषणच्या तुलनेत मंगळवारी या उत्सवाच्या दिवशी ध्वनीप्रदूषण आढळून आले नाही. उलट २० ते ३० डेसीबलचा फरक जाणवला असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदविले. उत्सवाच्या दिवशी कुठेही वाहतूक कोंडी नाही, रस्ते अडवले नसल्याचे तसेच लाऊड स्पिकर नसल्याचे दिसून आले, असे ते म्हणाले.

डॉ. बेडेकर यांनी नोंदविलेले निरीक्षण खालीलप्रमाणे

ठिकाण। वेळ। डेसीबल

भगवती शाळा : १.३०। ७० - ७५

तलावपाळी। १.४०। ८०- ८५

जांभळी नाका १.४२। ८०- ८५

वर्तक नगर। २ ७०

समता नगर। २.१०। ८०

वरील आवाज हा सभोवतालचा रहदारीचा, वाहतुकीचा असल्याचे मत बेडेकर यांनी आपल्या निरीक्षणात नोंदविले.

Web Title: No increase in noise pollution on the day of Dahihandi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.