उल्हासनगरात नेपाळी वॉचमन नको! विजयालक्ष्मी ज्वेलर्स चोरीत वॉचमन नेपाळीसह साथीदार
By सदानंद नाईक | Published: June 30, 2023 06:41 PM2023-06-30T18:41:03+5:302023-06-30T18:41:15+5:30
विजयालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची तिजोरी गॅस कटरने फोडून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने चोरी प्रकरणी वॉचमनसह पत्नी व ३ साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर : विजयालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची तिजोरी गॅस कटरने फोडून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने चोरी प्रकरणी वॉचमनसह पत्नी व ३ साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकारने नेपाळी वॉचमन नकोरे बाबा अशी भूमिका ज्वलर्स दुकानदारांनी घेतली असून आमदार कुमार आयलानी यांनी पोलीस उपायुक्त पाठारे यांची भेट घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, शिरू चौक परिसरातील विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानात रविवारी चोरी झाल्याची घटना उघड झाली. चोरी ज्वलर्स दुकानाचा वॉचमन यानें पत्नी व साथीदारासह केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे उघड झाली असून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने लोखंडी तिजोरी गॅस कटरने तोडून लंपास केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या तुकड्या नेपाळी वॉचमन, पत्नीसह साथीदाराच्या मार्गावर आहेत.
विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकान सोनार गल्ली येथे असून सोन्याचे दागदागिने बनविण्याचे अनेक दुकाने आहेत. शहरातील शिरू चौकातील विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानात तब्बल ३ कोटी २० लाख किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. यानिमित्त आमदार कुमार आयलानी यांनी भाजप शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त सुधाकर पठारे यांची भेट घेऊन, चौकशीची मागणी केली. यापूर्वी मुकुट फायनन्ससह ज्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांश नेपाळी वॉचमन यांचा हात असल्याचे उघड झाले. त्यामुळे ज्वलर्स, इमारती आदी ठिकाणी नेपाळी वॉचमन नकोरे बाबा म्हणण्याची वेळ आली. पोलिसांनीही वॉचमन ठेवताना त्यांच्याकडील कागदपत्र घेऊन, स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन यापूर्वी केले होते. पोलीस उपायुक्त पठारे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपा जिल्हा अध्यक्ष जमनू पुरसवानी, उल्हासनगर शॉपकीपर अशोषियेशन अध्यक्ष दीपक छतलानी, सोनारा नव जवान मंडळ प्रेसिडेंट जितू पाहुजा, ज्वलरी बाजार अध्यक्ष अशोक वलेछा यांच्यासह सोनारा गल्लीतील व्यापारी उपस्थित होते.
नेपाळी वॉचमनच्या शोधार्थ पोलीस पथके
विजयालक्ष्मी ज्वलर्स मध्ये झालेल्या चोरीत वॉचमन हा त्याच्या पत्नीसह ३ ते ४ साथीदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सहभागी असल्याचे कैद झाले. उल्हासनगर पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग आदीचे पथक वॉचमनच्या शोधार्थ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.