ठाण्यात २६ जणांवर भारी पडले होते ‘नोटा’चे व्होट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:15 AM2019-04-20T00:15:57+5:302019-04-20T00:16:24+5:30
निवडणुकीच्या वेळेस मतदान करताना मागील काही वर्षांपासून ‘नोटा’चा वापरही होऊ लागला आहे.
ठाणे : निवडणुकीच्या वेळेस मतदान करताना मागील काही वर्षांपासून ‘नोटा’चा वापरही होऊ लागला आहे. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल, तर त्यावेळेस ‘नोटा’चा वापर केला जातो. मागील निवडणुकीत छोट्या पक्षांसह अपक्ष धरून एकूण २६ उमेदवारांना ‘नोटा’पर्यंतचीसुद्धा मते मिळवता आली नव्हती. आपल्याला मते मिळणार नाहीत, हे माहीत असतानाही काही उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत असतात. परंतु, त्यांना त्यांची जागा हा मतदारराजा दाखवत असतो. दरम्यान, मागील निवडणुकीत या २६ उमेदवारांना एकूण ४७ हजार ८६१ मते मिळाली होती. तर, १३ हजार १७४ मतदारांनी ‘नोटा’चा अधिकार बजावला होता. केवळ मतांच्या विभाजनासाठीच ही मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असल्याच्या चर्चा नेहमी होत असतात. परंतु, मताधिक्यापासून कोसो दूर हे राहत असल्याचे दिसून आले आहे.
>
>नोटा म्हणजे काय?
ठडळअ म्हणजे ठङ्मल्ली डा ळँी अुङ्म५ी (यापैकी कुणीही नाही). जर, ईव्हीएम मशीनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल, तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असते. ते दाबले तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.
>9,094,29
मते दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या निवडणुकीत मिळाली होती. शिवसेनेचे राजन विचारे यांना 5,95,364 तर राष्टÑवादीचे संजीव नाईकांना 3,14,065 मते मिळाली.
>उमेदवार पक्ष मते
। कमलाकर तायडे भारिप ३,९२२
। जैन सीमा पीरिपा १,५०५
। पठाण जावेद बीएमयूपी १,२९१
। पराग नेवाळकर क्रांतिकारी ९३७
। बर्नाडशा डेविड खोरिपा ३,०१६
। महेश राठी एनजेपी ३,४०१
। सिंह राजेश राष्टÑीय समाज पक्ष १६९८
। नोटा नोटा १३,१७४