रेल्वे स्थानकांतील पादचारी पूलच नव्हे; तर अरुंद जिनेही धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 04:16 AM2017-09-30T04:16:56+5:302017-09-30T04:17:16+5:30

केवळ पादचारी पूलच नव्हे, तर मुंबईतील अनेक स्थानकांतील अरुंद जिन्यांमुळेही चेंगराचेंगरी होण्याची भीती टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने केलेल्या अभ्यास अहवालात व्यक्त केली होती.

No pedestrian bridge in railway station; So narrow and dangerous to anyone | रेल्वे स्थानकांतील पादचारी पूलच नव्हे; तर अरुंद जिनेही धोकादायक

रेल्वे स्थानकांतील पादचारी पूलच नव्हे; तर अरुंद जिनेही धोकादायक

googlenewsNext

- नारायण जाधव ।

ठाणे : केवळ पादचारी पूलच नव्हे, तर मुंबईतील अनेक स्थानकांतील अरुंद जिन्यांमुळेही चेंगराचेंगरी होण्याची भीती टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने केलेल्या अभ्यास अहवालात व्यक्त केली होती. २०१६ मध्ये टीआयएसएसच्या अमिता भिडे, रतुला कुंडू, पायल तिवारी यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या ११४ स्थानकांचा अभ्यास करून हा जेंडर अहवाल तयार केला आहे. यात केवळ फलाटांची उंचीच नव्हे, तर मुंबईतील परेल-एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलांप्रमाणेच दादर, लोअर परेल, कल्याण, कुर्ला, ठाणे, विरार अशा स्थानकांतील पादचारी पुलांसह ठाणे, दादर, मानखुर्द, कांजूरमार्ग, मुलुंड स्थानकांतील अरुंद जिनेही धोकादायक असल्याचा इशारा दिला होता. मात्र, याकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्यानेच शुक्रवारी परेल-एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी झाल्याचे आता दिसते आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेचे क्षेत्र ४६५ किमी असून एकूण ११४ स्थानके आहेत. या ठिकाणांहून ७५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. यात ७७ टक्के पुरुष, तर २३ टक्के महिला प्रवाशांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वेसह संबंधित कोणतीच यंत्रणा गंभीर नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

अहवालातील सूचना
परेल-एल्फिन्स्टन रोड स्थानकांतील पादचारी पुलाप्रमाणेच दादर, लोअर परेल, कल्याण, कुर्ला, ठाणे, विरार, स्थानकांतील पादचारी पुलांची तसेच ठाणे, दादर, मानखुर्द, कांजूरमार्ग, मुलुंड स्थानकांतील जिन्यांची व इतर गर्दीच्या स्थानकांतील पादचारी पूल आणि जिन्यांची रुंदी वाढवणे, त्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याची सूचना या अहवालात करण्यात आली आहे.
शिवाय पोलीस, महिला प्रवाशांची सुरक्षा, स्वच्छतागृहे आणि स्थानक ते संबंधित विभागांत अंतर्गत प्रवासासाठी नाममात्र दरात सार्वजनिक वाहतुकीची सोय करण्यास सांगण्यात आले आहे.
पोलीस, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतेपासून ते फलाट आणि लोकल व फलाटामधील गॅप, पादचारी पूल, जिने, पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल, कनेक्टिव्हिटी, रेल्वे स्थानकांतून बाहेर पडण्याचे मार्ग, स्थानकापासून इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहतूक सुविधा आहे की नाही, अशा विविध मुद्द्यांचा विचार या अहवालात करण्यात आला आहे.
अनेक स्थानकांत महिला प्रवाशांची सुरक्षा वाºयावर असल्याचा इशाराही या अहवालात दिला आहे. ठाण्यात बांधलेल्या फलाट क्रमांक १ ते १० जोडणाºया पुलाच्या पायºयाही अशाच आहेत.

ठळक मुद्दे
पुरेसे पोलीस नसणे - वाशी, गोवंडी, कांजूरमार्ग, पनवेल, मीरा रोड
खाद्यपदार्थ स्टॉलची समस्या - अंधेरी, गोवंडी, रे रोड, खोपोली, कल्याण, वांद्रे, मुंब्रा, चुनाभट्टी, कांदिवली,
चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, विरार, वाशी
अपुरी विद्युतव्यवस्था - वाशी, नेरूळ, बेलापूर, घणसोली, रबाळे, गोवंडी, कांजूरमार्ग
जिन्याची समस्या - ठाणे, दादर, मानखुर्द,
कांजूरमार्ग, मुलुंड
रॅम्पची गरज - कुर्ला, दहिसर, करी रोड
फलाट आणि लोकलमधील गॅप - कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, दादर, कुर्ला, मानखुर्द, सीएसएमटी, पनवेल, नेरूळ, कोपरखैरणे, विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रूझ, विरार, खोपोली, कर्जत, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, शहाड, रे रोड, कॉटनग्रीन, मशीद, भायखळा, परेल, लोअर परेल, भांडुप, नाहूर, सॅण्डहर्स्ट रोड, घाटकोपर, विद्याविहार, वांद्रे, वडाळा, ठाणे, मुलुंड, गोरेगाव, बोरीवली, वाशी, अंधेरी

Web Title: No pedestrian bridge in railway station; So narrow and dangerous to anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.