दोन वर्षांनंतरही निवृत्तीवेतन नाही; कर्मचा:यांची मूक निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:09+5:302021-09-25T04:44:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : अधिसंख्यपदावर वर्ग केलेल्या कर्मचा:यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे झाली आहेत. मात्र, त्यांना अजूनही निवृत्तिवेतन ...

No pension even after two years; Silent protests by employees | दोन वर्षांनंतरही निवृत्तीवेतन नाही; कर्मचा:यांची मूक निदर्शने

दोन वर्षांनंतरही निवृत्तीवेतन नाही; कर्मचा:यांची मूक निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : अधिसंख्यपदावर वर्ग केलेल्या कर्मचा:यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे झाली आहेत. मात्र, त्यांना अजूनही निवृत्तिवेतन लागू केले नाही. त्यामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी मूक निदर्शने केली. याशिवाय महात्मा गांधींच्या जयंती दिनी उपोषणाला बसण्याचा इशाराही प्रशासनाला दिला.

आफ्रोह या संघटनेच्या नेतृत्वाखाली या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहाजवळ ही निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अनुसरून २१ डिसेंबर २०१९ ला शासन निर्णय जारी करण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून झाली होती. मात्र, त्यांनी जमातीचे प्रमाणपत्र जमा न केल्यामुळे त्यांना ११ महिन्यांच्या अधिसंख्या पदावर वर्ग करण्यात आले होते. पण त्यांना अजूनही सेवानिवृत्ती वेतन लागू न केल्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व संघटनेचे दयानंद कोळी, अर्जुन मेस्त्री, घनश्याम हेडाऊ, नरेंद्र भिवापूरकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले.

--

Web Title: No pension even after two years; Silent protests by employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.